advertisement

Mumbai : मुंबईतील उच्चभ्रू सोसायटी, बिल्डिंग नंबर 27... मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये भयानक घडलं

Last Updated:

मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीच्या बिल्डिंग क्रमांक 27 मध्ये घरकाम करणाऱ्या महिलेसोबत भयानक कृत्य घडलं आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मुंबईतील उच्चभ्रू सोसायटी, बिल्डिंग नंबर 27... मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये भयानक घडलं
मुंबईतील उच्चभ्रू सोसायटी, बिल्डिंग नंबर 27... मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये भयानक घडलं
मुंबई : मुंबईतील काशीमिरा भागात राहत असणाऱ्या महिलेची मिरा-भाईंदरमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिरा-भाईंदर परिसरामध्ये एका 40 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव सुमन असून ती मिरा-भाईंदरमधील चंदेश अकॉर्ड या इमारतीमधल्या अनेक घरांमध्ये घरकाम करत होती.
मंगळवारी चंदेश अकॉर्डमधील बिल्डिंग क्रमांक 27 मधील एका घरात सुमनची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. आरोपीने महिलेवर चाकूने सपासप वार केले, यातले दोन वार पोटात, एक छातीवर आणि एक मानेवर करण्यात आला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती.
जखमी अवस्थेमध्येच महिलेला तात्काळ गुरूकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच मीरारोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबईतील उच्चभ्रू सोसायटी, बिल्डिंग नंबर 27... मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये भयानक घडलं
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement