Satra: सातारा हादरलं, 3 तासांमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी अपघात, 3 जणांचा मृत्यू, अंगावर शहारे आणणारा VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
कराड शहरात आजचा दिवस अपघाताचा ठरला आहे. गेल्या तीन तासात तीन वेगवेगळे अपघात झाले आहे. या तिन्ही अपघात तीन जणांचा मृत्यू झाला
विशाल पाटील, प्रतिनिधी
सातारा: साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कराड शहरात आजचा दिवस अपघाताचा ठरला आहे. गेल्या तीन तासात तीन वेगवेगळे अपघात झाले आहे. या तिन्ही अपघात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, कराड शहरासाठी आजचा बुधवारचा दिवस हा अपघाताचा वार ठरला आहे. संध्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणी ३ अपघात घडले आहे. कराड शहरात एका भरधाव डंपरने प्राध्यापक महिलेला उडवलं. सुषमा किर्दते असं अपघातात मृत्यू झाल्या प्राध्यापिकेचं नाव आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सातारा: कराडमध्ये अपघाताचा वार, तीन तासात तीन वेगवेगळ्या अपघात तीन ठार pic.twitter.com/hoXvqeFVAy
— VIRALबाबा (@viralmedia70) March 25, 2026
advertisement
सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतं आहे की, प्राध्यापिका सुषमा किर्दते या आपल्या स्कुटीवरून चौकातून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने स्कुटीला धडक दिली. काही कळायच्या आता स्कुटीही डंपरखाली सापडली. यामध्ये चाकाखाली सापडून सुषमा किर्दते यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुषमा किर्दते यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहे.
advertisement
आणखी दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू
दरम्यान, कराडमध्ये ही घटना घडल्यानंतर काही वेळातच मलकापूर शहरात हिट अँड रनचा थरार पहायला मिळाला. मलकापूर येथील कोयना वसाहत भाजी मंडईतील भाजी विक्रेती महिलेला भरधाव कारने चिरडून कार कठड्यावर अडकली. या अपघातात महिला जागीच ठार झाले तर तीन भाजी विक्रेता महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात कोयना वसाहत भाजी मंडई इथं घडला. उषा बाळू रौंदाळे (वय ४७, रा. मलकापूर ) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
advertisement
अनेक वर्षापासून कोयना वसाहत इथं रस्त्यावरच भाजी मंडई भरते. बुधवारी रात्री सात साडेसातच्या दरम्यान भरधाव वेगात आलेल्या कारने एका दुचाकीला धडक देत भाजी विकण्यासाठी बसलेल्या महिलेला चिरडलं. त्यानंतर ही कार रस्त्यालगत असणाऱ्या बोर्डला धडक देत कठड्यावर जाऊन अडकली. सदर कार महिला चालवत होती, असं घटनास्थळावरील लोकांनी सांगितलं. दरम्यान, जखमी झालेल्या भाजीविक्रेतीला स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपचारार्थ दवाखान्यात हलवलं. या भाजी मंडईत या अगोदरही किरकोळ अपघात झाले आहेत. याबाबत मलकापूर पालिकेला वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे आज मोठी दुर्घटना घडल्याचं पहायला मिळालं.
advertisement
तर, पुणे बेंगलोर महामार्गावर खोडशी गावाजवळ तिसरा अपघात झाला आहे. या अपघातात ॲपेरिक्षा चालक ठार झाला आहे. कराडमधील कृष्णा कॅनॉल परिसरात दुचाकीवरील दोघे अपघातात जखमी झाले आहेत. या अपघातामुळे कराड शहर पोलीस ठाण्यात लोकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 10:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satra: सातारा हादरलं, 3 तासांमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी अपघात, 3 जणांचा मृत्यू, अंगावर शहारे आणणारा VIDEO








