IPL 2026 : 150 च्या स्पीडने करणार स्टंपचे दोन तुकडे... KKR ला मिळाली हर्षित राणाची रिप्लेसमेंट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे, पण त्याआधीच केकेआरला 3 फास्ट बॉलरना मुकावं लागलं. पण आता केकेआरला हर्षित राणाचा बदली खेळाडू मिळाला आहे.
मुंबई : आयपीएल 2026 च्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे, पण त्याआधीच केकेआरला 3 फास्ट बॉलरना मुकावं लागलं. हर्षित राणा हा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे, तर मथिशा पथीराणा दुखापतीतून बरा होत आहे, त्यामुळे तो सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. केकेआरने लिलावामध्ये मुस्तफिजुर रहमानला विकत घेतलं होतं, पण बांगलादेशच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये बंदी घातल्यामुळे त्यानेही माघार घेतली.
आता आयपीएल सुरू व्हायच्या 3 दिवस आधीच केकेआरला हर्षित राणाचा बदली खेळाडू मिळाला आहे. मागच्या बऱ्याच काळापासून भारतीय टीममधून बाहेर असलेला फास्ट बॉलर नवदीप सैनी केकेआरच्या टीममध्ये आला आहे. सैनी एक वेळ आयपीएलमधला सगळ्यात जलद बॉल टाकणारा बॉलर होता. आयपीएलमध्ये सैनीने 152.85 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉलिंग केली होती.
हरियाणाच्या करनालमध्ये जन्मलेला नवदीप सैनी दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. आयपीएल 2026 च्या लिलावात सैनीला कोणत्याच टीमने विकत घेतलं नव्हतं. सैनी केकेआरच्या टीममध्ये आधीच आला होता, तसंच तो केकेआरच्या वॉर्म अप मॅचमध्येही खेळला होता.
advertisement
भारताकडून 21 मॅच खेळला सैनी
33 वर्षांचा नवदीप सैनी भारताकडून 2 टेस्ट, 8 वनडे आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला, त्याच्या नावावर एकूण 23 विकेट आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2021 साली गाबामध्ये ऐतिहासिक टेस्ट मॅच जिंकली होती, त्या सामन्यात सैनी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होता. ऋषभ पंतने विनिंग शॉट मारला तेव्हा नॉन स्ट्रायकर एन्डला सैनीच होता. 2021 नंतर मात्र त्याला टीम इंडियाकडून संधी मिळाली नाही.
advertisement
सैनीचं आयपीएल करिअर
नवदीप सैनी आयपीएलमध्ये दिल्लीसोबतच आरसीबी आणि राजस्थानकडूनही खेळला आहे. 32 सामन्यांमध्ये सैनीच्या नावावर 23 विकेट आहेत. 40 रनवर 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमध्ये सैनी त्याचा शेवटचा सामना 2023 साली राजस्थानकडून खेळला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सैनीच्या नावावर 212, लिस्ट ए मध्ये 118 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 77 विकेट आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 10:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 150 च्या स्पीडने करणार स्टंपचे दोन तुकडे... KKR ला मिळाली हर्षित राणाची रिप्लेसमेंट!









