advertisement

IPL चा सगळ्यात वादग्रस्त नियम बदलणार... रोहित-हार्दिकच्या विरोधानंतर BCCI यू टर्न घेणार!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या मोसमाआधी आयपीएलच्या सर्व 10 कर्णधारांची बीसीसीआयसोबत बुधवारी मुंबईमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये बहुतेक सर्व कर्णधारांनी आयपीएलच्या एका नियमाबाबत सर्वाधिक नाराजी व्यक्त केली.

IPL चा सगळ्यात वादग्रस्त नियम बदलणार... रोहित-हार्दिकच्या विरोधानंतर BCCI यू टर्न घेणार!
IPL चा सगळ्यात वादग्रस्त नियम बदलणार... रोहित-हार्दिकच्या विरोधानंतर BCCI यू टर्न घेणार!
मुंबई : आयपीएल 2026 च्या मोसमाआधी आयपीएलच्या सर्व 10 कर्णधारांची बीसीसीआयसोबत बुधवारी मुंबईमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये बहुतेक सर्व कर्णधारांनी आयपीएलच्या एका नियमाबाबत सर्वाधिक नाराजी व्यक्त केली, त्यानंतर आता बीसीसीआय या नियमाचा पुनर्विचार करणार असल्याचं समोर आलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने भर पत्रकार परिषदेमध्ये या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली होती, तसंच त्याआधी रोहित शर्मानेही हा नियम भारतीय क्रिकेटसाठी योग्य नसल्याचं म्हणाला होता.
आयपीएल 2023 पासून इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू झाला होता, तेव्हापासून हा नियम वादात सापडला. 2024 मध्ये बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेयर हा नियम 2027 पर्यंत वाढवला, पण आता पुढच्या मोसमात या नियमाबाबत पुनर्विचार करू असं बीसीसीआयने बैठकीमध्ये कर्णधारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बहुसंख्य कर्णधारांचा विरोध

'बीसीसीआयने हा नियम २०२७ पर्यंत वाढवला असला तरी, बहुसंख्य कर्णधारांनी 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमावर आपली मते मांडली आणि नाराजी व्यक्त केली. त्यांना सांगण्यात आले की, या नियमाचा आढावा केवळ 2027 च्या हंगामानंतरच घेतला जाऊ शकतो, त्यापूर्वी नाही,' असे आयपीएलच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले.
advertisement
या आठवड्याच्या सुरुवातीला, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने रोहित शर्माप्रमाणेच 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमावर टीका केली होती. 'मला हा नियम आवडत नाही कारण मी स्वतः एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पूर्वी आम्ही टीममध्ये ऑलराऊंडर खेळाडूंची निवड करायचो. आता मात्र टीम मॅनेजमेंट एक स्पेशलिस्ट बॅटर किंवा बॉलरला पसंती देते. ऑलराऊंडरची काय गरज आहे? असं या नियमांमुळे त्यांना वाटतं. मला हा नियम आवडत नाही, पण नियम आहे, त्यामुळे आम्हाला तो पाळावाच लागतो', असं अक्षर पटेल म्हणाला.
advertisement

रोहितनेही केली होती टीका

याआधी 2024 मध्ये रोहित शर्मानेही इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमावर टीका केली होती. 'मी या नियमाचा चाहता नाही, कारण या नियमामुळे भारतीय क्रिकेटमधील ऑलराऊंडरच्या विकासात अडथळा येतो', असं रोहित शर्मा म्हणाला होता. तर हार्दिक पांड्यानेही एखादा ऑलराऊंडर बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये तितकाच चांगला असेल तरच त्याला या नियमामुळे टीममध्ये संधी मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली होती.
advertisement
ग्लेन फिलिप्ससारख्या परदेशी खेळाडूनेही या नियमाचा ऑलराऊंडरच्या भविष्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असं मत मांडलं होतं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL चा सगळ्यात वादग्रस्त नियम बदलणार... रोहित-हार्दिकच्या विरोधानंतर BCCI यू टर्न घेणार!
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement