MS Dhoni च्या एका चुकीने हारली CSK, ऋतुराजला न विचारता थालाने घेतला निर्णय? पांड्याची कॉपी करायला गेला अन्...

Last Updated:

Devon Conway Retired Out : चेन्नई सुपर किंग्जला 13 बॉलमध्ये 49 धावांची गरज असताना मैदानात सेट झालेल्या डेव्हिड कॉन्वेला रिटायर्ड आऊट करण्यात आलं. त्यामुळे वाद पेटला आहे.

Devon Conway Retired Out cost to loss csk
Devon Conway Retired Out cost to loss csk
IPL 2025 Punjab Kings vs Chennai Super Kings : पंजाब न्यू क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात मंगळवारी रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ 200 धावा देखील करू शकला नाही. दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघानं घरच्या मैदानात दिमाखात विजय नोंदवला. पंजाब किंग्जने सीएसकेसमोर 220 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, चेन्नईची फलंदाजी पुन्हा फेल ठरली अन् 180 हून अधिक धावसंख्या चेस करण्यात सीएसकेला जमलं नाही. मात्र, या सामन्यात सीएसकेचा एक निर्णय फेल ठरला अन् चेन्नईला याचे परिणाम भोगावे लागले आहेत.

13 बॉल काही असताना डेव्हिड कॉन्वे रिटायर्ड आऊट

सामना अंतिम टप्प्यात आल्यावर सीएसकेने एक निर्णय घेतला. 18 व्या ओव्हरमध्ये धोनी आणि डेव्हिड कॉन्वे मैदानात खेळत होते. त्यावेळी धोनीने डेव्हिड कॉन्वेला रिटायर्ड आऊट होण्यास सांगितलं. मॅचला 13 बॉल काही असताना डेव्हिड कॉन्वे रिटायर्ड आऊट झाला आणि त्याच्या जागी रविंद्र जडेजा आला. जडेजा आणि धोनी यांची जोडी पुन्हा फिनिशिंगला आली अन् दोघांना पुन्हा सामना जिंकवून देता आला नाही. सीएसकेचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने रिटायर्ड आऊट होण्यापूर्वी 49 चेंडूत 69 धावा केल्या होत्या.
advertisement

वीरेंद्र सेहवागची टीका

हार्दिक पांड्याने तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करून जी चूक केली, तीच सीएसकेने देखील डेव्हिड कॉन्वेच्या बाबतीत केली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. डेव्हिड कॉन्वेला रिटायर्ड आऊट करायचं होतं तर खूप आधी करायला पाहिजे होतं. सामना कधीही चेंज होईल, अशा परिस्थितीत डेव्हिड कॉन्वेला बाहेर पाठवणं चुकीचं आहे, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलं होतं. डेव्हिड कॉन्वे चांगली फलंदाजी करत असताना थालाने घेतलेला निर्णय योग्य होता का? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
advertisement

ऋतुराज गायकवाड म्हणतो...

दरम्यान, डेव्हिड कॉन्वे हा टॉप ऑर्डरचा टायमिंगने खेळणारा फलंदाज आहे. तो टॉप ऑर्डरमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. पण रविंद्र जडेजाचा रोल खूप वेगळा आहे. तुम्हाला माहिती असतं की बॅट्समन स्ट्रगल करत आहे. आम्ही त्याला वेळ दिला पण अखेर परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागला, असं ऋतुराज गायकवाड याने म्हटलं आहे. त्यामुळे ऋतुराज धोनीच्या चुकांवर पांघरुन टाकतोय का? असा सवाल विचारला जात आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MS Dhoni च्या एका चुकीने हारली CSK, ऋतुराजला न विचारता थालाने घेतला निर्णय? पांड्याची कॉपी करायला गेला अन्...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement