IND vs PAK : भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सामन्याचं तिकीट फक्त 438 रुपयांना, घरबसल्या कसं बूक कराल?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेसाठीची तिकीट विक्री गुरूवार 11 डिसेंबरला संध्याकाळी 6.45 वाजता सुरू झाली.
मुंबई : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेसाठीची तिकीट विक्री गुरूवार 11 डिसेंबरला संध्याकाळी 6.45 वाजता सुरू झाली. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यातल्या मॅचच्या तिकीटांची किंमत काही ठिकाणी 100 रुपये ठेवण्यात आली आहे, तर श्रीलंकेत हीच किंमत 1 हजार रुपये आहे. आयसीसी स्पर्धांमधली तिकीटांची ही सगळ्यात कमी किंमत आहे.
भारत-पाकिस्तान मॅचचं तिकीट कितीला?
भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट नेमकं किती आहे? हे जाणण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात लीग स्टेजचा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याचं तिकीट फक्त 438 रुपये (1,500 श्रीलंकन रुपये) ठेवण्यात आलं आहे.
कसं बूक कराल तिकीट?
टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी चाहते बुक माय शो ऍपवरून घरबसल्या तिकीट काढू शकतात.
advertisement
काय आहे प्रक्रिया?
- सगळ्यात आधी बुक माय शो ऍपवर अकाऊंट असेल तर लॉग इन करा, अन्यथा अकाऊंट सुरू करून ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
- ऍप सुरू झाल्यानंतर वर्ल्ड कप टॅबवर क्लिक करा
- यानंतर तुम्हाला मॅच ज्या ठिकाणी बघायची आहे, ते निवडा
- भारतीय टीमचा सामना पाहायचा असेल, तर पेजवर थांबा आणि तिकीट लाईव्ह होईपर्यंत रिफ्रेश करा.
advertisement
- पेज सुरू होताच तुमच्या सीट निवडा आणि बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करा.
- सिटची निवड करताच तुम्हाला तिकीट M-तिकीटाच्या माध्यमातून दिलं जाईल. हे तिकीट मॅचच्या दिवशी किंवा काही वेळ आधी ऍक्टिव्हेट होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 6:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सामन्याचं तिकीट फक्त 438 रुपयांना, घरबसल्या कसं बूक कराल?









