Team India : गौतम गंभीर आणि शुभमनमध्ये फूट? ड्रेसिंग रूमधील वाद चव्हाट्यावर, कारण काय?

Last Updated:

Team India Dispute, indian dressing room, pitch dispute, Shubhman Gill, Gautam Gambhir, Spin likely pitch, टीम इंडिया, ड्रेसिंग रूम, शुभमन गिल, गौतम गंभीर

Dispute in indian dressing room Over Spin likely pitch
Dispute in indian dressing room Over Spin likely pitch
Indian Cricket Team : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर आता पीचवरून वादाला तोंड फुटलं आहे. WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेच्या टीमला रोखण्यासाठी भारतीय संघव्यवस्थापनाने इडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला अनुकूल तयार केली होती. मात्र, भारताने तयार केलेल्या या जाळ्यात दक्षिण आफ्रिकेचे बॅट्समन नाही, तर भारतीय बॅट्समनच अडकल्याचं पहायला मिळालं. अशातच आता गंभीरच्या रणनितीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

खेळपट्टीवरून मतभेद

साऊथ अफ्रिकेविरुद्ध भारतीय टीमला विजयासाठी फक्त 124 धावांचे माफक आव्हान होतं, पण हे लक्ष्यही टीम इंडियाला गाठता आलं नाही. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या महत्त्वाच्या कसोटी मॅचमध्ये भारताला 30 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभी यांच्यात खेळपट्टीच्या निवडीवरून मतभेद असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे.
advertisement

शुभमन गिल काय म्हणाला होता?

या मतभेदांच्या चर्चेला कारण ठरलं. शुभमन गिलचे गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येचे एक वक्तव्य... त्यावेळी शुभमन गिलने स्पष्टपणे सांगितलं होतं की, 'फिरकी गोलंदाजीला जास्त मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांना प्राधान्य देण्याची सिस्टीम टीमने सोडून दिली पाहिजे.' असं असतानाही, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली मॅच फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळवण्यात आली.
advertisement

पीच क्युरेटरसोबत बैठक

दरम्यान, टीम इंडियामध्ये कॅप्टनचं काहीही ऐकलं जात नाही. फक्त गंभीरची दादागिरी सुरू आहे, असं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. कोलकाता कसोटीआधी पीच क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्यासोबत वारंवार बैठका झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल चार दिवस पीचला पाणी देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे बॉल कधी खाली रहायचा तर कधी बॉल उसळी घेत होता. त्यामुळे आता अनेक वाद उद्भवल्याचं समोर येतंय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : गौतम गंभीर आणि शुभमनमध्ये फूट? ड्रेसिंग रूमधील वाद चव्हाट्यावर, कारण काय?
Next Article