Suraj Chavan Home : सूरज चव्हाणचा बंगला तयार! केला गृहप्रवेश, आलिशान घराचा पहिला VIDEO समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan Home : बिग बॉस मराठी सीझन 5 विजेता सूरज चव्हाणने बारामतीतील नव्या आलिशान घरात गृहप्रवेश केला. अजित पवार यांच्या मदतीने हे घर बांधले गेले आहे. सूरजच्या आलिशान घराची पहिली झलक समोर आली आहे.
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण लवकरच लग्न करतोय. सूरज चव्हाणच्या लग्नाआधी त्याचं हक्काचं घर बांधलं. सूरज चव्हाणने अखेर त्याच्या नव्या घरी गृहप्रवेश केला आहे. नव्या घराच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ सूरज चव्हाणने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. सूरज चव्हाणचं आलिशान घर पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सूरज चव्हाणच्या नव्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सूरज चव्हाणने त्याच्या घराला बिग बॉस असं नाव दिलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणला घर बांधून देण्यासाठी मदत केली होती. काही दिवसांआधी सूरज चव्हाणने अजित पवार यांची भेट घेऊन त्यांने आभार मानले होते. त्यानंतर आता काही दिवसांतच सूरज चव्हाणने त्याच्या नव्या घरी गृहप्रवेश केला आहे.
आज केला माझ्या नवीन घराचा गृह प्रवेश, असं म्हणत सूरज चव्हाणने गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सूरज चव्हाणनं बारामतीमधील त्याचं नवं घर खूपच आलिशान आहे. मोठी दार खिडक्या, फ्लोरिंग, किचन सगळं हायटेक आणि अद्ययावर टेक्नॉलॉजीनं तयार करण्यात आलं आहे. घरात एन्ट्री करताचा मोठा हॉल आहे. मोठं किचन वरच्या खोलीत जाण्यासाठी खास जिने बांधण्यात आलं आले आहेत. सूरज चव्हाणचं नवं आलिशान घर पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात आश्चर्य नवल पाहायला मिळतंय.
advertisement
advertisement
सूरज चव्हाणने नव्या घरात गृहप्रवेश केला. त्याची बहिण त्याच्याबरोबर होती. घरात सूरजच्या हातून गृहप्रवेश आणि गणेशपूजन करण्यात आलं. सूरजच्या सगळ्या बहिणी आणि त्यांची मुलं यावेळी उपस्थित होती. सूरज चव्हाण त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश करतेवेळी प्रचंड आनंदी होता. काही दिवसांतच सूरज चव्हाण लग्न करून बायकोला या नव्या घरात आणणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 10:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Suraj Chavan Home : सूरज चव्हाणचा बंगला तयार! केला गृहप्रवेश, आलिशान घराचा पहिला VIDEO समोर


