किंगचं शतक होताच ‘जबरा फॅन’ मैदानात घुसला, थेट पायावरच ठेवलं डोकं; थरारक प्रकारानंतर विराटनं पाहा काय केलं?

Last Updated:

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना सध्या चांगलाच रंगला आहे. भारतीय खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये दिसून येत आहेत. अशातच आज काही रेकॉर्डसही ब्रेक झाले आहेत. साउथ आफ्रिकेने टॉस जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

News18
News18
IND vs SA ODI : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना सध्या चांगलाच रंगला आहे. भारतीय खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये दिसून येत आहेत. अशातच आज काही रेकॉर्डसही ब्रेक झाले आहेत. साउथ आफ्रिकेने टॉस जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि टीम इंडियाला फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. रांची इथे सुरु असलेल्या या सामन्यात भारत सध्या उत्तम कामगिरी करताना दिसून येत आहे. अशा परिथिती या सामन्यात एक अशी घटना घडली ज्याने सर्वांची मन जिंकली आहेत.
सामन्यात काय घडतय?
भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सामना सुरू एकदिवसीय सामना सुरु आहे. या वेळेस साउथ आफ्रिकेने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत भारतने त्यांची ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारताची सुरुवात निराशजनक झाली पण अशा आहे की भारत या सामन्याचा शेवट निराशजनक होऊ देणार नाही.
सामन्याची सुरुवात भारतासाठी निराशजनक
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामन्याची सुरुवात भारताच्या फलंदाजी होत आहे. या सामन्यात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे मैदानात आले. पण यशस्वीला हवी तशी सुरुवात करता आली नाही आणि त्यांनी स्वस्तात विकेट गमावली. भारताला पहिलाच झटका खूप स्वस्तात बसला. तिसऱ्याच ओव्हरमध्ये भारताला पहिला जैसवालच्या रूपात बसला. मात्र 16 बॉल मध्ये 18 रन्स करत यशस्वीची विकेट पडली. या नंतर रोहित शर्माचीही विकेट पडली असती पण नशिबाची साथ मिळाली. यशस्वीची विकेट पडताच ऋतुराज गायकवाड मैदानात आला पण तोही टिकू शकला नाही आणि केवळ 8 धाव करून तो बाद झाला. हिटमॅन आणि किंगने डाव सांभाळला. रोहितने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि 57 रन्स करून तोही बाद झाला.
advertisement
विराटचं शतक पूर्ण होताच फॅनची रिॲक्शन
विराट कोहलीने 102 बॉल्समध्ये त्याची सेंचुरी पूर्ण केली आहे. त्याने चौका मारून त्याच शतक पूर्ण केलं. हे शतक पूर्ण करून तो एकदिवसीय क्रिकेट इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. विराट कोहलीच शतक पूर्ण होताच एक अशी घटना घडली ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं. किंग कोहलीच शतक पूर्ण होताच एक फॅन मैदानात धावून आला आणि त्याचा पायावर नतमस्तक झाला. अनेकांची इच्छा असते आपल्या फेव्हरेट क्रिकेटर किंवा सेलिब्रिटीला भेटायची, अशीच एक मुमेंट होती ती त्या चाहत्याची. त्याने विराटच्या पायावर डोकं ठेवताच गार्डने त्याला खेचण्याचा प्रयत्न केला पण इथे विराटच्या एका कृतीने मन जिंकलं. त्याने हळूच त्या गार्डला हात दाखवून थांबवलं जेणेकरून त्याचा फॅनला कोणताही त्रास होणार नाही.
advertisement
advertisement
विराटची तगडी सेंचुरी
विराट कोहलीने त्याचे 52 वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे 83 वे शतक आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटने 102 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक गाठण्याच्या मार्गावर कोहलीने सात चौकार आणि पाच षटकार मारले. त्याच सामन्यात, रोहित शर्माने त्याचे 60 वे एकदिवसीय अर्धशतकही झळकावले. रोहित शतकापर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 52 व्या वेळी 100 धावांचा टप्पा ओलांडत दमदार कामगिरी केली.
advertisement
विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेट इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे त्याचे सहावे एकदिवसीय शतक होते. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात प्रत्येकी पाच शतके केली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
किंगचं शतक होताच ‘जबरा फॅन’ मैदानात घुसला, थेट पायावरच ठेवलं डोकं; थरारक प्रकारानंतर विराटनं पाहा काय केलं?
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement