advertisement

Rohit Sharma : 'तुम्हाला मुलगी झाली...', बारसं पाहून रोहित इमोशनल, मुंबईच्या राजाचा अस्सल मराठी Video

Last Updated:

रोहित शर्मावर त्याचे चाहते इतकं प्रेम का करतात? हे टीम इंडियाच्या हिटमॅनने त्याच्या कृतीवरून पुन्हा दाखवलं आहे.

'तुम्हाला मुलगी झाली...', बारसं पाहून रोहित इमोशनल, मुंबईच्या राजाचा अस्सल मराठी Video
'तुम्हाला मुलगी झाली...', बारसं पाहून रोहित इमोशनल, मुंबईच्या राजाचा अस्सल मराठी Video
मुंबई : रोहित शर्मावर त्याचे चाहते इतकं प्रेम का करतात? हे टीम इंडियाच्या हिटमॅनने त्याच्या कृतीवरून पुन्हा दाखवलं आहे. रोहित शर्माच्या एका चाहत्याने त्याच्या मुलीचं नाव समायरा असं ठेवलं, जे रोहितच्या स्वत:च्या मुलीचंही नाव आहे. एवढच नाही तर त्याने बारश्याच्या कार्यक्रमाची पूर्ण थीम ही रोहित शर्माची ठेवली. कार्यक्रमाच्या ठिकाणी चाहत्याने रोहित शर्माचे वेगवेगळे फोटो ठेवले होते. रोहित शर्मा ज्या पद्धतीने टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी घेण्यासाठी गेला होता, अगदी त्याच पद्धतीने रोहितचा हा चाहता मुलीचं नाव दाखवण्यासाठी गेला.
रोहित शर्माच्या चाहत्याने टीम इंडियाची जर्सी उघडून त्यातून मुलीच्या नावाची घोषणा केली. तसंच रोहित शर्माप्रमाणेच या जर्सीचा क्रमांकही 45 होता. चाहत्याचा हा व्हिडिओ रोहित शर्मापर्यंत पोहोचला आणि मग रोहितनेही एक व्हिडिओ बनवून चाहत्यासाठी खास मराठीमध्ये व्हिडिओ बनवला आहे.
advertisement

काय म्हणाला रोहित शर्मा?

'ठाकूर फॅमिली, तुम्हाला आमच्या शर्मा घरातून भरपूर शुभेच्छा, तुम्हाला मुलगी झाली आम्हाला हे ऐकून बरं वाटलं. भविष्यासाठी खूप शुभेच्छा, तुमचं आयुष्य खूप चांगलं जाईल, अशी आशा व्यक्त करतो', असं रोहित शर्मा म्हणाला आहे. रोहित शर्माचा हा व्हिडिओ पाहून ठाकूर कुटुंबाने एकच जल्लोष केला आणि मुंबईचा राजा रोहित शर्मा, अशा घोषणा दिल्या.
advertisement

रोहित शर्माची तयारी सुरू

दरम्यान रोहित शर्माने आयपीएल 2026 च्या तयारीला सुरूवात केली आहे. रोहितने जिममधले तसंच मैदानातले काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. 26 मार्चपासून आयपीएल 2026 ला सुरूवात होणार आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'तुम्हाला मुलगी झाली...', बारसं पाहून रोहित इमोशनल, मुंबईच्या राजाचा अस्सल मराठी Video
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement