BCCI च्या माजी अध्यक्षांचं निधन! पाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी रात्रभर जागून तयार केलं होतं मैदान
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Inderjit Singh Bindra passes away : इंद्रजित सिंह बिंद्रा यांनी दिवंगत जगमोहन दालमिया यांच्या साथीने 1987 मध्ये भारतात पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Inderjit Singh Bindra Passes Away : भारतीय क्रिकेट प्रशासनातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष इंद्रजित सिंह बिंद्रा यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ज्यामुळे क्रीडा जगतात मोठी शोककळा पसरली आहे. बिंद्रा यांनी भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर नेण्यासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने क्रिकेट प्रशासनातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे. इंद्रजित सिंह बिंद्रा यांचं नाव घेतलं की आठवते ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच...!
आशियाई देशांमध्ये क्रिकेटला नवीन ओळख
बिंद्रा यांनी दिवंगत जगमोहन दालमिया यांच्या साथीने 1987 मध्ये भारतात पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे, तोपर्यंत हे वर्ल्ड कप केवळ इंग्लंडमध्येच खेळवले जात होते. इंग्लंडबाहेर हा मोठा इव्हेंट यशस्वी करून त्यांनी क्रिकेट विश्वातील सत्तेचे समीकरण बदलून टाकले. त्यांच्या या ऐतिहासिक पावलामुळेच आशियाई देशांमध्ये क्रिकेटला एक नवीन ओळख आणि ताकद मिळाली.
advertisement
The BCCI mourns the passing of former BCCI President - Mr IS Bindra.
The Board's thoughts and prayers are with his family and loved ones. pic.twitter.com/boNAhwNSnL
— BCCI (@BCCI) January 25, 2026
खेळपट्टी तयार करून घेतली
advertisement
बिंद्रा यांचा कामाप्रती असलेल्या समर्पणाचा एक किस्सा आजही अनेकांच्या लक्षात आहे. एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचपूर्वी मोहालीत जोरदार पाऊस झाला होता. सर्वांना वाटले की मॅच होणार नाही, मात्र बिंद्रा यांनी हार मानली नाही. ते रात्रभर मैदानावर थांबले आणि ग्राउंड स्टाफकडून खेळपट्टी तयार करून घेतली. सकाळी जेव्हा लोक पोहोचले, तेव्हा मॅच वेळेवर सुरू होण्यास तयार होती, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पाकिस्तानचे मॅनेजर फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांना फोन करून मॅच खेळण्यासाठी बोलावून घेण्यात आलं होतं.
advertisement
बँकेकडून कर्ज मिळवून मैदान उभं केलं
मोहाली येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची उभारणी ही बिंद्रा यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते. पीसीएचे माजी अधिकारी सुशील कपूर यांनी आठवण सांगितली की, हे स्टेडियम उभारण्यासाठी बिंद्रा यांनी जीवापाड मेहनत घेतली होती. त्याकाळी स्टेडियमसाठी कर्ज मिळवणे सोपे नव्हते, तरीही त्यांनी अनेक बँकांचे उंबरठे झिजवले आणि अखेर एका बँकेकडून कर्ज मिळवून 1996 च्या वर्ल्ड कपपूर्वी हे शानदार मैदान उभे केलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 11:01 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI च्या माजी अध्यक्षांचं निधन! पाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी रात्रभर जागून तयार केलं होतं मैदान









