रोहित-विराटने सिरीज जिंकवली पण गौतम आपली पोळी भाजून गेला, गंभीरने उघड धमकी दिलेला IPL Owner कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Gautam Gambhir blasts On parth jindal : टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाला खडे बोल सुनावले आहेत. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.
Gautam Gambhir Press Conference : साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर खालच्या सुरात बोलणारा गौतम गंभीर वनडे सिरीजनंतर जिंकताच वर मान करून पुन्हा आपल्याच आक्राळ भाषेत उत्तर देऊ लागल्याचं पहायला मिळालं. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रो-को च्या (रोहित आणि कोहली) कामगिरीने आणि यशस्वी जयस्वालच्या शानदार शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाने सामना जिंकला तसेच सिरीज देखील नावावर केली आहे. त्यानंतर गंभीर प्रेस कॉन्फरेन्सला आला अन् आपला पाढा सुरू केला.
रोहित अन् विराटचं नावही घेतलं नाही
टीम इंडियाच्या कामगिरीवर बोलताना प्रेस कॉन्फरेन्समध्ये गंभीरने दोन्ही सिनियर खेळाडूंचं नाव घेणं देखील पसंत केलं नाही. रोहित आणि विराटने मिळून टीम इंडियाला सिरीज जिंकून दिली पण गंभीरने वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांचं कौतूक करण्यात समाधान मानलं. यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीरने आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांना देखील फटकारल्याचं पहायला मिळालं.
advertisement
DC चे मालक पार्थ जिंदाल यांना टोला
कसोटी मालिका गमावल्यानंतर क्रिकेटशी काहीही संबंध नसलेल्या काही लोकांनी भाष्य केलं. एका आयपीएल मालकाने वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक असल्याबद्दल लिहिलं, हे आश्चर्यकारक आहे. लोकांनी त्यांच्या मर्यादेत राहणं खूप महत्वाचं आहे, असं गौतम गंभीर म्हणाला. गौतम गंभीरचा हा टोला दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांना होता.
advertisement
पार्थ जिंदाल काय म्हणाले होते?
दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी लिहिलं होतं की, "जवळपासही नाही, घरच्या मैदानावर किती निराशाजनक कामगिरी! मला आठवत नाही की आमच्या कसोटी संघाला घरच्या मैदानावर इतकं कमकुवत पाहिलं आहे! जेव्हा रेड-बॉल स्पेशालिस्टची निवड केली जात नाही तेव्हा असंच घडतं. हा संघ रेड-बॉल क्रिकेटमध्ये आमची खोल ताकद अजिबात प्रतिबिंबित करत नाही. भारतीय कसोटी क्रिकेटने रेड-बॉल स्पेशालिस्ट प्रशिक्षकाकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे."
advertisement
चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता
दरम्यान, एखाद्या व्यक्तीला टीका करण्याचा अधिकार देखील नाही का? असा सवाल विचारला जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीर पत्रकार परिषदेत उपस्थित झाला. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. सिरीज जिंकल्यानंतर खुलेपणाने बोलण्याची गंभीरला आयती संधी मिळाली होती. त्याचा भरपूर वापर गंभीरने केल्याचं पहायला मिळालं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 7:25 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहित-विराटने सिरीज जिंकवली पण गौतम आपली पोळी भाजून गेला, गंभीरने उघड धमकी दिलेला IPL Owner कोण?


