Gautam Gambhir : सूर्या लास्ट तक खेलेगा..! गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये आला अन् तिलकची विकेट घेऊन गेला, टीम इंडियाची चॅट लीक
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Gautam Gambhir throw Tilak Varma Wicket : मॅचमध्ये एक असा क्षण आला जेव्हा टीम इंडियाची रनरेट कमी होत होती, तेव्हा हेड कोच गौतम गंभीर स्वतः मैदानात उतरला. ड्रिंक्स ब्रेकदरम्यान गंभीरने मैदानात जाऊन तिलक वर्माला काही खास टिप्स दिल्या.
IND vs PAK Drinks Break Chat Leak : कोलंबोमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मॅचमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपली ताकद दाखवली अन् पाकिस्तानचा पराभव आहे. या मॅचमध्ये भारताने टॉस गमावला असला तरी, इशान किशनने 77 धावांची आक्रमक बॅटिंग करत भारतीय डावाला आकार दिला. ओपनर अभिषेक शर्मा शुन्यावर बाद होऊनही भारताने चांगली सुरुवात केली होती, मात्र ईशान किशनच्या विकेटनंतर धावगतीला ब्रेक लागला.
गंभीर स्वतः मैदानात उतरला अन्...
मॅचमध्ये एक असा क्षण आला जेव्हा टीम इंडियाची रनरेट कमी होत होती, तेव्हा हेड कोच गौतम गंभीर स्वतः मैदानात उतरला. ड्रिंक्स ब्रेकदरम्यान गंभीरने मैदानात जाऊन तिलक वर्माला काही खास टिप्स दिल्या. सोशल मीडियावर गंभीरचे हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो तिलकच्या खांद्यावर हात ठेवून त्याला खेळाबद्दल मार्गदर्शन करताना दिसला. त्यावेळी गंभीरने दोघांना सल्ला दिला की, सूर्या शेवटपर्यंत खेळेल. तू रिस्क घेऊन खेळ... स्वत: तिलक वर्माने याचा खुलासा मॅच संपल्यानंतर केला.
advertisement
तिलक विकेट गमावून बसला
गंभीरने दिलेल्या या सल्ल्याचा मात्र तिलक वर्माला फारसा फायदा झाला नाही. उलट, ब्रेक संपल्यानंतर लगेचच मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तिलक आपली विकेट गमावून बसला. गंभीरचा आयडिया येथे सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळालं, कारण सांभाळून खेळणारा तिलक बाद झाल्यामुळे भारतावर पुन्हा एकदा प्रेशर निर्माण झालं.
advertisement
Head coach Gautam Gambhir having chat with Tilak Varma!
- Tilak playing slow (btw) pic.twitter.com/RJzzlbyaHw
— Rohit Sharma Fan (@hitmanfanfollow) February 15, 2026
तिलक वर्माची पाकिस्तानविरुद्ध कामगिरी
दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वाच्या मॅचमध्ये तिलक वर्माने तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना 24 बॉल्सचा सामना केला. त्याने 104.16 च्या स्ट्राईक रेटने 25 रन्स बनवले, ज्यामध्ये त्याने दोन फोर आणि एक सिक्स लगावला. मात्र, ज्यावेळी टीमला त्याच्याकडून मोठ्या खेळीची गरज होती, तेव्हाच तो बाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 1:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Gautam Gambhir : सूर्या लास्ट तक खेलेगा..! गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये आला अन् तिलकची विकेट घेऊन गेला, टीम इंडियाची चॅट लीक








