GT vs MI Eliminator : फटाके मुल्लानपूरमध्ये फुटले, पण दिवाळी इंग्लंडमध्ये, मुंबईच्या धमाक्यानंतर टेन्शन वाढलं

Last Updated:

इंग्लंड विरूद्ध टेस्ट सामन्यासाठी निवड झालेले काही खेळाडू आजच्या आयपीएल सामन्यात फुसके बार ठरले. त्याऐवजी भारत अ संघातील खेळाडूंनी इंग्लंडमध्ये शतक ठोकून धमाका केला आहे.

GT vs MI Eliminator
GT vs MI Eliminator
GT vs MI Eliminator : मुल्लानपुरच्या मैदानात एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावून 228 धावा ठोकल्या आहेत.त्यामुळे गुजरात टायटन्ससमोर 229 धावांचे आव्हान आहे. दरम्यान इंग्लंड विरूद्ध टेस्ट सामन्यासाठी निवड झालेले काही खेळाडू आजच्या आयपीएल सामन्यात फुसके बार ठरले. त्याऐवजी भारत अ संघातील खेळाडूंनी इंग्लंडमध्ये शतक ठोकून धमाका केला आहे.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय़ त्याने यशस्वीही करून दाखवला कारण मुंबईने चांगली सूरूवात केली. या सामन्यात रोहित शर्माने 81 धावांची सर्वांधिक खेळी केली. त्याच्यानंतर जॉनी बेअरस्ट्रोने 47 धावा ठोकल्या होत्या. शेवटच्या क्षमी हार्दिकने 9 बॉलमध्ये 22 धावा कुटल्या.एकूणच मुंबईच्या खेळाडूंनी धडाकेबाज फलंदाजी करून गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे.
advertisement
गुजरातकडून साई किशोर आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट काढल्या होत्या.आणि सिराजला एक विकेट मिळाली होती. या खेळाडूंनी जरी विकेट काढली असली तरी त्यांची मुंबईच्या फलंदाजांनी प्रचंड धुलाई केली आहे.
विशेष गुजरात संघातील प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराजने, वॉशिंग्टन सुंदर आणि कर्णधार शुभमन गिल यांची इंग्लंड विरूद्ध टेस्ट सामन्यासाठी निवड झाली आहे. मात्र हे खेळाडू आजच्या सामन्यात फेल ठरले आहेत. मोहम्मद सिराजने 37, प्रसिद्ध कृष्णाने 53 धावा दिल्या होत्या.त्यांच्यासोबत कर्णधार शुभमन गिल शून्य धावावर बाद झाला.त्यामुळे मुल्लानपूरमध्ये हे खेळाडू अपयशी ठरले आहेत.तर भारत अ च्या खेळाडूंनी इंग्लंडमध्ये धमाका केला आहे.
advertisement
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, कुसल मेंडिस (विकेटकिपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
GT vs MI Eliminator : फटाके मुल्लानपूरमध्ये फुटले, पण दिवाळी इंग्लंडमध्ये, मुंबईच्या धमाक्यानंतर टेन्शन वाढलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement