Teachers Day ला दिली गुरूदक्षिणा! टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने मन जिंकलं, प्रशिक्षकाला 'इतक्या' लाखाची मदत

Last Updated:

टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी मनं जिंकलं आहे.या खेळाडूने शिक्षक दिनी आपल्याला क्रिकेटचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकाला गुरूदक्षिणा दिली आहे.या खेळाडूंनी प्रशिक्षकाला 80 लाखाची मदत केली आहे.

hardik pandya Krunal pandya
hardik pandya Krunal pandya
Teachers Day : येत्या 9 सप्टेंबरपासून आशिया कपला सूरूवात होणार आहे.या स्पर्धेसाठी टीम इंडियाने सरावाला सूरूवात केली आहे.या दरम्यान टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी मनं जिंकलं आहे.या खेळाडूने शिक्षक दिनी आपल्याला क्रिकेटचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकाला गुरूदक्षिणा दिली आहे.या खेळाडूंनी प्रशिक्षकाला 80 लाखाची मदत केली आहे.त्यामुळे खेळाडूंनी दाखवलेल्या कृतीचं सध्या कौतुक होतं आहे.त्यामुळे हे खेळाडू नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
हे खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून पांड्या ब्रदर्स आहेत. हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या या खेळाडूंना कोच जिंतेंद्र सिंह यांनी क्रिकेटचे धडे दिले होते. सिंह यांनी दोन्ही खेळाडूंना कठीण काळात मदत केली आणि त्यांचा खेळ चांगला करण्यात मदत केली होती. त्यामुळेच हे खेळाडू यशस्वी ठरले आणि देशासाठी खेळले होते.त्यामुळे आज यशस्वी झाल्यानंतर या खेळाडूंनी त्यांच्या प्रशिक्षकाला मदतीचा हात दिला होता.
advertisement
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना जितेंद्र सिंह म्हणाले,2018 मध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याने माझ्या बहिणीच्या लग्नात खूप मदत केली. त्यांनी फक्त पैसेच दिले नाहीत तर मला कार खरेदी करण्यासाठी 20 लाख रुपयेही दिले. गेल्या वर्षी माझ्या दुसऱ्या बहिणीचे लग्न झाले, त्यातही हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनी मला खूप भेटवस्तू दिल्या.तसेच त्यांनी सांगितले की लग्न निश्चित ठरल्यावर सांगा आणि आम्ही सर्व गरजा पूर्ण करू असा त्यांनी शब्द दिला होता.
advertisement
हार्दिक पांड्याला 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याचे प्रशिक्षक जितेंद्र सिंगची आई खूप आजारी पडली होती.पण जितेंद्र सिंह यांनी हार्दिक पांड्याला याबद्दल सांगितले नाही.जितेंद्र सिंग म्हणाले,'मी हार्दिकला काहीही सांगितले नाही,मला त्याचे लक्ष दुसरीकडे वळवायचे नव्हते.' मात्र, बडोद्याला परतल्यानंतर जेव्हा त्याला हे कळले तेव्हा त्याने मला प्रश्न विचारले.मी त्याला सर्व काही सांगितले आणि त्यानंतर हार्दिकने मला सांगितले की माझे सर्व पैसे घ्या आणि तुमच्या आईची काळजी घे.'
advertisement
जितेंद्र सिंग पुढे म्हणाले,'2015-16 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर हार्दिकने मला एक कार भेट दिली, ज्याची किंमत 5-6 लाख रुपये होती.ती त्याची पहिली मालिका होती आणि तो आर्थिकदृष्ट्या मजबूत नव्हता पण तरीही त्याने माझ्यासाठी एक कार खरेदी केली.जेव्हा मी ती घेण्यास नकार दिला तेव्हा तो म्हणाला की तूम्ही बाईकवरून इकडे तिकडे जा,आम्हाला तुम्हाला दुखापत होऊ नये असे वाटते, म्हणून आम्ही तुझ्या सुरक्षिततेसाठी कार खरेदी केली आहे.त्यामुळे जितेंद्र सिंहच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या दोघेही त्यांच्या प्रशिक्षकाचा किती आदर करतात. ते त्यांचा किती आदर करतात.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Teachers Day ला दिली गुरूदक्षिणा! टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने मन जिंकलं, प्रशिक्षकाला 'इतक्या' लाखाची मदत
Next Article
advertisement
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं, मुलीही ऐकून रडतात
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं
    View All
    advertisement