Asia Cup : नेट प्रॅक्टिससाठी हार्दिक घालून आला इतकं महाग घड्याळ, पाकिस्तानच्या अख्ख्या टीमचा एवढा पगारही नाही!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडिया आशिया कप 2025 खेळण्यासाठी दुबईला पोहोचली आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा स्टार हार्दिक पांड्या वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे.
दुबई : टीम इंडिया आशिया कप 2025 खेळण्यासाठी दुबईला पोहोचली आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा स्टार हार्दिक पांड्या वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या केसांना पांढरा रंग दिला आहे, त्यामुळे तो चर्चेत आला, पण टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसमध्ये हार्दिक पांड्याने घातलेलं घड्याळही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हार्दिक पांड्याने घातलेल्या या घड्याळाची किंमत पाकिस्तानच्या खेळाडूंना वर्षाला मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त आहे. एवढंच नाही तर हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत आशिया कप विजेत्या टीमला मिळणाऱ्या रकमेपेक्षाही अधिक आहे.
हार्दिक पांड्याने सराव दरम्यान मनगटावर घातलेल्या घड्याळाची किंमत कोटींची असल्याचे सांगितले जाते. यावर्षी स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्या टीमला तीन लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 2.6 कोटी रुपये मिळणार असल्याचे वृत्त आहे. त्याच वेळी, हार्दिक पांड्याच्या हातातील घड्याळाची किंमत यापेक्षा सुमारे 10 पट जास्त आहे. सराव करताना हार्दिकने घातलेल्या घड्याळाची किंमत सुमारे 20 कोटी रुपये आहे.
advertisement
का आहे हार्दिकचं घड्याळ खास?
हार्दिकने घातलेले घड्याळ रिचर्ड मिल RM27-04 आहे. एका वेबसाइटनुसार, त्याची किंमत 2250000 अमेरिकन डॉलर्स आहे. हार्दिकच्या हातात दिसणारे घड्याळ संपूर्ण जगात फक्त 50 लोकांसाठी बनवण्यात आले आहे. हे घड्याळ विशेषतः स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदालसाठी बनवण्यात आले आहे. या घड्याळाचे वजन फक्त 30 ग्रॅम आहे. त्यात 12,000 ग्रॅमपेक्षा जास्त फोर्सचा दाब सहन करण्याची क्षमता आहे, जो एक विक्रम आहे.
advertisement
पाकिस्तानी टीमच्या पगारापेक्षा महाग घड्याळ
आशिया कपसाठी पाकिस्तानने ज्या 17 जणांची टीम निवडली आहे, त्यांचा वर्षाचा एकूण पगारही हार्दिकच्या घड्याळ्याच्या किंमतीपेक्षा कमी आहे. पाकिस्तानच्या टीममध्ये 7 असे खेळाडू आहेत ज्यांना ग्रेड बी मध्ये ठेवण्यात आलं आहे. यात अबरार अहमद, फखर जमान, हारिस राऊफ, हसन अली, सॅम अयूब, सलमान आगा आणि शाहीन आफ्रिदी यांचा समावेश आहे. या 7 खेळाडूंना पीसीबी वर्षाला 1 कोटी 69 लाख रुपयांच्या जवळपास पैसे देते. या 7 खेळाडूंचा वर्षाचा एकूण पगार 11 कोटी 83 लाखांच्या घरात आहे. तर सी ग्रेडमधल्या 5 खेळाडूंचा वर्षाचा पगार 4.69 कोटी रुपये आहे, यात फहीम अश्रफ, हसन नवाज, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाज आणि शाहिबजादा फरहान यांचा समावेश आहे.
advertisement
डी ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना वर्षाला 56 लाख रुपयांचं पॅकेज आहे, यातल्या 5 खेळाडूंचा एकूण पगार 2.81 कोटी रुपये आहे. म्हणजेच पाकिस्तानच्या आशिया कपसाठी निवड झालेल्या 17 खेळाडूंचा एकूण पगारही 19.34 कोटी रुपये होतो, ही रक्कम हार्दिक पांड्याच्या घड्याळाच्या किंमतीपेक्षाही कमी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 7:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : नेट प्रॅक्टिससाठी हार्दिक घालून आला इतकं महाग घड्याळ, पाकिस्तानच्या अख्ख्या टीमचा एवढा पगारही नाही!