VIDEO : इंग्लंडच्या हॅरी ब्रुककडून Rishabh Pant ची स्लेजिंग, LIVE सामन्यात काय विचारला प्रश्न? स्टंप माईकमध्ये सगळंच कैद झालं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Harry Brook Slage Rishabh Pant : दुसऱ्या कसोटीत (IND vs ENG 2nd Test) इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक आणि भारताचा विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत यांच्यात स्टंप माईकवर ऐकायला मिळाला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
Rishabh Pant Stump mic Video : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत आता निकालाचा दिवस आला आहे. सामना जिंकण्यासाठी आज दोन्ही संघ प्रयत्न करतील. मात्र, मैदानात खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीसोबतच काही हलकेफुलके क्षणही कॅमेऱ्यात कैद होतात, जे आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. असाच एक मजेशीर संवाद इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक आणि भारताचा विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत यांच्यात स्टंप माईकवर ऐकायला मिळाला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
नेमकं काय संभाषण झालं?
तुझी टेस्ट क्रिकेटमधली फास्टेस्ट सेंच्युरी कोणती आहे? असा सवाल हॅरी ब्रुकने ऋषभला विचारला. त्यावेळी ऋषभने थोडा विचार केला आणि 80 ते 90 मिनिटात केली असेल, असं ऋषभ म्हणतो. त्यावरून ब्रुकने ऋषभला डिवचलं. मी माझी फास्टेस्ट सेंच्युरी 55 बॉलमध्ये केली होती. तू आज तो रेकॉर्ड मोडू शकतो, असं ब्रुक पंतला म्हणाला. हा ठीक आहे पण सगळे इनिंग रेकॉर्डसाठी करायच्या नसतात. ठीक आहे, मला विक्रमांची फार हाव नाही. जेव्हा होईल तेव्हा होईल, असं ऋषभ पंत हॅरी ब्रुकला म्हणताना दिसतोय.
advertisement
पाहा Video
advertisement
दरम्यान, हा संवाद कोणत्याही प्रकारच्या स्लेजिंगचा भाग नसून, दोन खेळाडूंदरम्यानचा मैदानातील मैत्रीपूर्ण आणि मजेशीर क्षण होता. दोघांनीही एकमेकांबद्दल आदर दाखवत केलेला हा संवाद क्रिकेट चाहत्यांना खूप आवडला आहे. ऋषभ पंतने विनम्रपणे दिलेले उत्तर विशेषतः अनेकांनी पसंत केलंय.
टीम इंडियाने पहिल्या डावात 587 धावा केल्या. त्यानंतर भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांवर गुंडाळून 180 रन्सची लीड मिळवली. भारताने दुसरा डाव हा 83 षटकांमध्ये 6 बाद 427 धावांवर घोषित केला. भारताने अशाप्रकारे इंग्लंडसमोर 608 धावांचं आव्हान ठेवलं. टीम इंडियासाठी दुसऱ्या डावात कर्णधार शुबमन गिल याने सर्वाधिक 161 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने नाबाद 69 धावा केल्या. ऋषभ पंत याने 65 रन्स जोडल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 06, 2025 8:45 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : इंग्लंडच्या हॅरी ब्रुककडून Rishabh Pant ची स्लेजिंग, LIVE सामन्यात काय विचारला प्रश्न? स्टंप माईकमध्ये सगळंच कैद झालं!