Jasprit Bumrah : तुम्ही खरंच बुमराहला ट्रोल करताय? सचिन तेंडुलकरनंतर 'या' दिग्गजाने क्रिकेट फॅन्सना सुनावलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
विशेष म्हणजे ज्या दोन सामन्यात भारत जिंकला होता, त्या दोन सामन्यात जसप्रीत बुमराह संघाचा भाग नव्हता. त्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
Harsha Bhogle on Jasprit Bumrah : भारत आणि इंग्लंडने प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आणि अॅडरसन तेंडुलकर ट्ऱॉफी मालिका बरोबरीत राहिली. विशेष म्हणजे ज्या दोन सामन्यात भारत जिंकला होता, त्या दोन सामन्यात जसप्रीत बुमराह संघाचा भाग नव्हता. त्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे. या दरम्यान क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर त्याच्या बचावासाठी आला, त्यानंतर आता समालोचक हर्षा भोगले यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.
समालोचक हर्षा भोगले यांनी या मुद्यावर आता भाष्य केले आहे. ते त्याच्या एक्सवर लिहतात की, खरंच?? बुमराहला ट्रोल करत आहात? आशा आहे की तुम्ही त्यापैकी नसाल पण जर असाल तर तुम्हाला बुमराह बनण्यासाठी काय सहन करावे लागते याची कल्पना नाही? हे खरे आहे. आणि तुम्हाला भारताच्या महान मॅचविनरपैकी एकाबद्दल काहीच कौतुक नाही, जो जवळजवळ इतर कोणत्याही गोलंदाजांपेक्षा जास्त षटके टाकतो,याची आठवण भोगले यांनी फॅन्सना करून दिली.
advertisement
सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया काय?
सचिन तेंडुलकरने रेडिटवर भारत-इंग्लंड सीरिजच्या विश्लेषणाचा व्हिडिओ केला आहे. 'बुमराहने खरोखर चांगली सुरूवात केली. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये तो खेळला नाही. यानंतर तिसऱ्या-चौथ्या टेस्टमध्ये तो खेळला. लॉर्ड्स टेस्टच्या इनिंगमध्येही त्याने 5 विकेट घेतल्या. बुमराहची बॉलिंग असाधारण आहे, त्याने आजपर्यंत जे केलं आहे ते अविश्वसनीय आहे. बुमराह सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, यात शंका नाही. मी त्याला इतर कोणत्याही बॉलरपेक्षा चांगलं मानतो', अशी प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.
advertisement
जसप्रीत बुमराहने 48 टेस्टमध्ये 219 विकेट घेतल्या आहेत, तर मोहम्मद सिराजला 41 टेस्टमध्ये 123 विकेट मिळाल्या आहेत. मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्टमध्ये 23 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज या सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 11:40 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jasprit Bumrah : तुम्ही खरंच बुमराहला ट्रोल करताय? सचिन तेंडुलकरनंतर 'या' दिग्गजाने क्रिकेट फॅन्सना सुनावलं


