Team India : टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूची सीरिजमधून माघार, रिप्लेसमेंटसाठी धावाधाव

Last Updated:

भारतीय क्रिकेट टीम सध्या युएईमध्ये आशिया कप खेळत आहे. सुपर-4 स्टेजच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पुन्हा एकदा पराभव केला.

टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूची सीरिजमधून माघार, रिप्लेसमेंटसाठी धावाधाव
टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूची सीरिजमधून माघार, रिप्लेसमेंटसाठी धावाधाव
मुंबई : भारतीय क्रिकेट टीम सध्या युएईमध्ये आशिया कप खेळत आहे. सुपर-4 स्टेजच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पुन्हा एकदा पराभव केला, त्यामुळे भारतीय टीम आशिया कपच्या फायनलच्या आणखी जवळ पोहोचली आहे, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. आशिया कपच्या फायनलनंतर 4 दिवसांमध्येच भारतीय टीम वेस्ट इंडिजविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये ऋषभ पंत खेळणार नसल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ऋषभ पंत वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टेस्ट सीरिजमध्ये खेळू शकणार नाही. इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीतून पंत अजूनही बरा होत आहे. पायाला दुखापत झाल्याने 27 वर्षीय पंत इंग्लंड सीरिजमधील शेवटचा सामना खेळू शकला नाही. ऋषभ पंतला बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्या रिहॅबसाठी वेळ हवा आहे. त्यामुळे भारताच्या टेस्ट टीममध्ये त्याची जागा कोण घेईल? हे पाहणे बाकी आहे.
advertisement

ऋषभ पंत फिट व्हायच्या मार्गावर

ऋषभ पंत अजूनही बंगळुरूमध्ये स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षण घेत आहे. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, त्याने अद्याप त्याची विकेटकीपिंग आणि बॅटिंगचा सराव पुन्हा सुरू केलेले नाही. त्यामुळे, भारतीय टीममध्ये त्याचे पुनरागमन अद्याप निश्चित झालेले नाही. 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजला तो मुकणार आहे. नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजसाठी तो फिट होईल अशी अपेक्षा आहे.
advertisement

पंतला बरे होण्यासाठी 6 आठवडे

ऋषभ पंतला फिट होण्यासाठी 6 आठवड्यांची गरज असल्याचं त्याला इंग्लंडमध्ये दुखापत झाली तेव्हाच स्पष्ट झालं होतं. ही सहा आठवड्यांची मुदत सप्टेंबरच्या सुरूवातीलाच संपली, पण तरीही तो ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळू शकणार नाही. पंतच्या जागी ध्रुव जुरेलला टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
इंग्लंड दौऱ्यात पंतच्या हाताला दुखापत झाल्यानंतर लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीदरम्यान जुरेलने विकेट कीपिंग केली. त्यानंतर ओल्ड ट्रॅफर्डवरील चौथ्या टेस्ट दरम्यान पंतच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतरही जुरेल विकेट कीपर म्हणून आला. त्यानंतर ओव्हलवरील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ध्रुव जुरेल टीम इंडियाकडून खेळला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूची सीरिजमधून माघार, रिप्लेसमेंटसाठी धावाधाव
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement