IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित आणि विराटला ICC कडून 'जोर का झटका', कुलदीपला मिळालं दिवाळी गिफ्ट!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Virat ICC Ranking : भारतीय क्रिकेट संघाचा नव्याने कर्णधार झालेला शुभमन गिल फलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल पोझिशनवर कायम आहे. तर विराट अन् रोहितला धक्का बसलाय.
India Tour of Australia : आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आणि टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. या दौऱ्यासाठी तब्बल सात महिन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले आहेत. अशातच आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC World ODI Ranking) बुधवारी मोठा धक्का दिला आहे.
रोहित अन् विराटला धक्का!
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत या दोन्ही प्लेअर्सची प्रत्येकी 1 स्थानाने घसरण झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा नव्याने कर्णधार झालेला शुभमन गिल फलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल पोझिशनवर कायम आहे. दुसरीकडे, बांगलादेशविरुद्धच्या 3 मॅचच्या एकदिवसीय सिरीजमधील प्रभावी प्रदर्शनाचा फायदा अफगाणिस्तानचा फलंदाज इब्राहिम झद्रानला झाला आहे आणि तो क्रमवारीत 8 स्थानांनी वरती आला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमचीही एका स्थानाने घसरण झाली आहे.
advertisement
रशीद खानची मारुती उडी
अफगाणिस्तानचा महत्त्वाचा प्लेअर रशीद खानने गोलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत 5 स्थानांनी मोठी झेप घेतली, ज्यामुळे केशव महाराजांचे अव्वल स्थान संपुष्टात आले आहे. रशीद आता एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज ठरला आहे. या क्रमवारीत पहिल्या 5 मध्ये श्रीलंकेचा महेश थीकशाना, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि भारताचा कुलदीप यादव यांचा समावेश आहे. अष्टपैलू प्लेअर्सच्या एकदिवसीय क्रमवारीत, अफगाणिस्तानचा अझमुल्ला उमरझाईने सिकंदर रझाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. मोहम्मद नबी 3 नंबरवर आहे आणि रशीद 4 नंबरवर आहे; रशीदने अष्टपैलू प्लेअर्सच्या क्रमवारीत 2 स्थानांची सुधारणा केली आहे. बांगलादेशचा मेहदी हसन मिराज एका स्थानाने खाली घसरला आहे.
advertisement
अभिषेक शर्माची बादशहात कायम
टी-20 क्रमवारीत भारतीय प्लेअर अभिषेक शर्माचे वर्चस्व कायम आहे, तो अव्वल पोझिशनवर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत वरुण चक्रवर्ती अव्वल स्थानी आहे आणि सॅम अयुब अष्टपैलू प्लेअर्सच्या क्रमवारीत पहिल्या नंबरवर आहे. भारताचा अष्टपैलू प्लेअर हार्दिक पंड्या 2 नंबरवर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंडचा जो रूट अव्वल फलंदाज आहे आणि भारताचा यशस्वी जयस्वाल 5 व्या पोझिशनवर आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल गोलंदाज आहे, तर रवींद्र जडेजा अव्वल अष्टपैलू प्लेअर आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 7:46 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित आणि विराटला ICC कडून 'जोर का झटका', कुलदीपला मिळालं दिवाळी गिफ्ट!