Yuvraj Singh : अभिषेकला ट्रेनिंग कशी दिली? युवराज सिंगने पहिल्यांदाच सांगितलं सिक्रेट, म्हणाला 'मी माझ्या वडिलांसारखा नाही...'

Last Updated:

Yuvraj Singh telling secret : 19 वर्षांच्या तरुणांच्या मनात काय चालले आहे हे समजून घेणे महत्त्वाचे असतं, असं युवराज सिंग म्हणाला.

Yuvraj Singh telling secret of abhishek sharma training
Yuvraj Singh telling secret of abhishek sharma training
Yuvraj Singh On father training : टीम इंडियाचा माजी बॅट्समन आणि वर्ल्ड कप विनर युवराज सिंग सध्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देत असून, त्याचा शिष्य अभिषेक शर्मा याच्या यशाने त्याचे कोचिंगचे कौशल्य सिद्ध केलं आहे. नुकत्याच पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत युवराजने आपला कोचिंगचा अंदाज त्याचे वडील आणि भारताकडून खेळलेले माजी क्रिकेटर योगराज सिंग यांच्यापेक्षा खूप वेगळा असल्याचं म्हटलं आहे. त्यावेळी युवराज सिंगने खेळाडूंसाठी महत्त्वाचं काय असतं, याचा उल्लेख केला.

मी माझ्या वडिलांसारखा नाही

युवी म्हणाला, "मी माझ्या वडिलांसारखा (योगराज सिंग) अजिबात नाहीये. मी खूप वेगळी व्यक्ती आणि वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या कोचिंगची पद्धत खूप वेगळी आहे." माझा विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही कोणाला कोच किंवा मेंटॉर करता, तेव्हा तुम्हाला त्यांच्या जागी उभे राहून त्यांचा माईंडसेट समजून घेणे आवश्यक आहे. त्यांना काय वाटत आहे, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. त्यांना फक्त काय करायचे हे सांगण्याऐवजी, त्यांच्या मनातील भावना ऐकून घेणे महत्त्वाचे असल्याचं युवराज सिंग म्हणाला आहे.
advertisement

माईंडसेट समजून घेणं आवश्यक

प्रशिक्षक आणि गुरू यांचं नातं एका 'पुश अँड पुल' प्रमाणे असायला हवे. तुम्ही काही गोष्टी घ्या आणि काही गोष्टी द्या. 19 वर्षांच्या तरुणांच्या मनात काय चालले आहे हे समजून घेणे महत्त्वाचे असतं, असं युवराज सिंग म्हणाला आहे. युवा खेळाडूंसाठी त्यांचा माईंडसेट समजून घेणं आवश्यक आहे, असंही युवराज सिंग म्हणाला आहे.
advertisement

जुन्या दिवसांची आठवण

युवराजने आपल्या जुन्या दिवसांची आठवण करत सांगितलं, "मी 19 वर्षांचा असताना, मी ज्या आव्हानांचा सामना करत होतो, ते कोणीही समजून घेतले नाही. त्यामुळे जेव्हा मी आता 19 किंवा 20 वर्षांच्या खेळाडूंना पाहतो, तेव्हा त्यांना मानसिकरित्या कोणती आव्हाने येत आहेत, हे मला माहीत असते. त्यामुळे त्यांना काय करायचे हे सांगण्याऐवजी, त्यांचे ऐकून घेणे, त्यांचा माईंडसेट समजून घेणे आणि त्यानुसार काम करणे महत्त्वाचे ठरते.", असंही युवराज सिंग म्हणाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yuvraj Singh : अभिषेकला ट्रेनिंग कशी दिली? युवराज सिंगने पहिल्यांदाच सांगितलं सिक्रेट, म्हणाला 'मी माझ्या वडिलांसारखा नाही...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement