Geyser Buying Tips : हिवाळ्यात गिझर खरेदी करायचाय? 'या' गोष्टी माहित हव्याच, अन्यथा होईल नुकसान
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Geyser Buying Important Tips : तुम्हाला हिवाळ्यात सकाळी सकाळी थंड पाण्याने आंघोळ करायची नसेल किंवा तुम्ही कायम गरम पाणी वापरात असाल तर गिझर बसवणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र गिझर खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा तुमचे मोठे होऊ शकते. चला पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती.
नोव्हेंबरमध्ये कडाक्याची थंडी येते. सकाळी थंड पाण्याने आंघोळ करणे कठीण असते. म्हणून या थंड पाण्यापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गिझर बसवणे. बरेच लोक आधीच त्यांच्या घरात गिझर बसवण्याचा विचार करत असतात. तुम्ही हिवाळ्यात गिझर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
advertisement
advertisement
advertisement
तुम्ही निवडलेल्या गीझरमध्ये काही सुरक्षा वैशिष्ट्ये असली पाहिजेत. यामध्ये टाकीच्या दाब वाढण्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह, पाण्याचे तापमान समायोजित करण्यासाठी अॅडजस्टेबल थर्मोस्टॅट आणि पाणी खूप गरम झाल्यास बंद करण्याची परवानगी देणारा ऑटोमॅटिक कट-ऑफ यांचा समावेश असावा. खरेदी करताना ही सुरक्षा वैशिष्ट्ये असल्याची खात्री करावी.
advertisement
advertisement
advertisement


