जयवंत वाडकरांच्या लेकीचा साखरपुडा, बेस्ट फ्रेंडला नवरी झालेलं पाहून लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डे भावुक, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Swanandi Berde Video Jaywant Wadakar Daughter Engagement : अभिनेते जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनीच्या साखरपुड्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. बेस्ट फ्रेंडच्या साखरपुड्यात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे भावुक झाली.
दिवळी झाली, तुळशीची लग्नही पार पडली. त्यानंतर आता लगीन सराईला सुरुवात झाली आहे. अनेक कलाकार मंडळींनी मागील काही दिवसांत लग्न आणि साखरपुडा केला. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनी देखील त्यांच्या मुलीचा साखरपुडा केला. जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनी वाडकर हिचा नुकताच साखरपुडा झाला. स्वामिनीच्या साखरपुड्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
स्वामिनीच्या साखरपुड्यातील एका व्हिडीओमध्ये अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे ही भावुक झाल्याचं दिसतंय. स्वामिनी आणि स्वानंदी दोघेही एकमेकींच्या बालमैत्रिणी आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे आणि जयवंत वाडकर यांच्यासारखीच त्यांची मैत्री आहे. गेली 25 वर्ष दोघी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. आपल्या मैत्रिणीच्या आयुष्याची नवी सुरुवात झालेली पाहून स्वानंदी भावुक झाली.
advertisement
व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की स्वामिनीला नवरी झालेलं पाहून स्वानंदीला रडू कोसळलं. स्वामिनीबद्दल बोलताना स्वानंदीला अश्रू अनावर झाले. स्वामिनीबद्दल बोलताना स्वानंदी म्हणाली, "25 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. आज तिचा साखरपुडा झाला आहे." स्वानंदीला अश्रू अनवार झाले. ती स्वामिनीला मिठी मारून रडली. ती पुढे म्हणाली, "या दोघांची लव्ह स्टोरी मी बघितली आहे. आज फायनली ते एन्गेज झालेत. मी खूप खुश आहे आणि इमोशनल झाले आहे."
advertisement
advertisement
जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनी हिच्याबद्दल सांगायचं झाल्यास, स्वामिनी ही मॉडेलिंग क्षेत्रात आहे. तिच्या मॉडेलिंगचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. HC London England या मोठ्या ब्रॅण्डची ती ब्रँड अँबॅसेडर आहे.
तर अभिनेते जयवंत वाडकर हे लेकीच्या साखरपुड्यात खूप आनंदी होते. त्यांनी सांगितलं, "एक दिवस मी शूटींगवरून आलो, स्वामिनी आणि विद्या मला म्हणाल्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं, काय बोलायचं आहे, मी काय चुकलोय का? असे खूप प्रश्न समोर आले. मग मला सांगितलं की असं असं आहे. पण मला ती जाणीव कुठेतरी होती, इतक्या वर्षांचा अनुभव आहे." स्वामिनी आणि तिचा नवरा वरूण दोघेही स्वामी भक्त असल्याचं जयवंत वाडकर यांच्या पत्नीने सांगितलं. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्यात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जयवंत वाडकरांच्या लेकीचा साखरपुडा, बेस्ट फ्रेंडला नवरी झालेलं पाहून लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डे भावुक, VIDEO


