कोंबडी किती अंडी देते? फक्त एक प्रश्न, पोलिसांनी तिघांना केली अटक; प्रकरण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
How Many Eggs Hen Lay : सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. पण नंतर एक प्रश्न आणि त्यावरून वाद सुरू झाला, कोंबडी किती अंडी घालते? हा वाद इतका टोकाला गेला की
वॉशिंग्टन : कोंबडी आधी की अंडं, हा वाद तसा खूप जुना आहे. आता कोंबडी अंडी किती घालते यावरून वाद झाला आहे. फक्त हा एक प्रश्न ज्यामुळे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. अमेरिकेच्या फ्लोरिडातील हे विचित्र प्रकरण आहे.
पोर्ट सेंट लुसी येथील ही घटना. 44 वर्षीय पीटर रियारा एका बंद पबच्या बाहेर तीन लोकांशी बोलत होता . सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. पण नंतर एक प्रश्न आणि त्यावरून वाद सुरू झाला, कोंबडी किती अंडी घालते? हा वाद इतका टोकाला गेला की चक्क गोळीबार झाला.
advertisement
रियाराला लक्षात आलं की ते त्याला मूर्ख बनवण्याचा किंवा फसवण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणून त्याने 45-कॅलिबरची बंदूक बाहेर काढली आणि चार गोळ्या झाडल्या. त्याच्यासोबत तिघं जण कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झालं. एक रस्त्याकडे पळून गेला, तर इतर दोघं लपले. सुदैवाने कुणालाही गोळी लागली नाही किंवा दुखापत झाली नाही. पण घटनास्थळी घबराट पसरली.
advertisement
पोलिसांनी सांगितलं की, रिएराने स्वतः 911 वर फोन करून घटनेची तक्रार केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तपासात असं दिसून आले की इतर तिघं रिएराच्या ओळखीचे होते आणि ते त्या रात्री भेटले होते. सर्वजण मद्यपान करत होते. रिएराशिवाय पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली. एकाने पोलिसाचा हिंसक प्रतिकार केला, तर दुसरा ज्याने हिंसाचार न करता प्रतिकार केला.
advertisement
पोलीस अधिकारी मेसिटी म्हणाले, "जर तुम्ही दारू पिऊन असाल तर शस्त्र उचलणं चांगलं नाही. त्याचा शेवट नेहमीच वाईट होतो." पीटर रियारा सध्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर अनेक आरोप आहेत.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 08, 2025 8:45 AM IST


