advertisement

IND vs AUS : मुंबईच्या पोरीला दिल्लीची हवा, ऑस्ट्रेलियाला नडली, विराट स्टाईलने शिवी दिली; VIDEO

Last Updated:

मुंबईच्या पोरीने खरतनाक गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजीच्या बळावर तिने ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या खेळाडूला आऊट केले आहे. विशेष म्हणजे तिने ज्या प्रकारे तिची विकेट काढली आहे, ते पाहता ऑस्ट्रेलियन खेळाडूला काहीच कळलं नाही आहे.

sayali satghare clean bold gesayali satghare clean bold georgia vollorgia voll
sayali satghare clean bold gesayali satghare clean bold georgia vollorgia voll
Australia Women vs India Women : टीम इंडियाचा महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियासोबत एकच टेस्ट सामना खेळते आहे. या सामन्यात मुंबईच्या पोरीने खरतनाक गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजीच्या बळावर तिने ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या खेळाडूला आऊट केले आहे. विशेष म्हणजे तिने ज्या प्रकारे तिची विकेट काढली आहे, ते पाहता ऑस्ट्रेलियन खेळाडूला काहीच कळलं नाही आहे. आणि या विकेटनंतर तिने ऑस्ट्रेलियन खेळाडूला शिवी दिली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली प्रतिस्पर्ध्यांना जशी शिवीगाळ करायचा, त्याचं प्रमाणे मुंबईच्या पोरीने ऑस्ट्रेलियाला अंगावर घेतलं होतं. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
खरं तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाने तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली होती. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली होती.यानंतर दोन्ही संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका देखील पार पडली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर क्लिन स्विप मिळवला होता. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक टेस्ट सामना खेळवला जात आहे. हा सामना रोमांचक पद्धतीने सूरू आहे.
advertisement
या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करताना 198 धावांवर ऑल आऊट झाली होती. टीम इंडियाकडून जेमीमा रॉड्रीग्जन 52 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.तिच्यासोबत शेफाली वर्माने 35 आणि काश्वी गौतमने 34 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर टीम इंडिया 198 धावांवर ऑल आऊट झाली.
advertisement
ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅनाबेल सुथरलँडने 4, लुसी हेमिल्टन 3, डार्सी ब्राऊनने 2 आणि अॅश्ले गार्डनरने 1 विकेट काढली होती. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावा दरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली सूरूवात केली होती.
ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया वॉल आणि फोईब लिचफिल्ड मैदानात उतरले होते. यावेळी मुंबईच्या सायली सातघरेने बुलेटच्या वेगाने बॉलिंग करत जॉर्जिया वॉलला क्लिन बोल्ड केले होते. विशेष म्हणजे सायली बॉल ऑफ स्टम्पवरून लेगच्या दिशेने वळला आणि लेग स्टम्प उडवला होता. ज्याप्रमाणे सायलीचा बॉल आत शिरला ते पाहून जॉर्जिया वॉल देखील शॉक झाली होती.अशाप्रकारे सायलीने वॉलला 2 धावांवर बाद केले होते. या विकेटनंतर सायलीने शिवी दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. जसा विराट कोहली प्रतिस्पर्ध्यांना शिवीगाळ करायचा,तशाच स्टाईलमध्ये सायलीने आज मैदानात अग्रेसिव्हपणा दाखवला होता.
advertisement
त्यानंतर क्रांती गौडने फोईब लीचफिल्डला जेमीमाच्या तात कॅच देऊन आऊट केले. यानंतर पुन्हा सायली सातघरेने अॅलीसा हिलीची विकेट काढली. मोठा शॉर्ट खेळण्याच्या प्रयत्नात ती जेमीमाच्या हातात कॅच देऊन बसली. सध्या एलिस पेरी आणि अॅनाबेल सुथरलँड मैदानात असून त्यांनी दिवसअखेर 3 विकेट गमावून 96 धावा केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : मुंबईच्या पोरीला दिल्लीची हवा, ऑस्ट्रेलियाला नडली, विराट स्टाईलने शिवी दिली; VIDEO
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement