IND vs ENG : इंग्लंडमध्ये KL Rahul चा क्लास, मॅचेस्टरमध्ये रचला इतिहास, सचिन तेंडुलकर राहुल द्रविडच्या पंक्तीत मिळवलं स्थान
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलने मॅचेस्टर टेस्टमध्ये इतिहास रचला आहे. केएल राहुलने इंग्लंडच्या मैदानावर टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्या 1000 धावा पुर्ण केल्या आहेत.
KL Rahul Completed 1000 Runs in England : टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलने मॅचेस्टर टेस्टमध्ये इतिहास रचला आहे. केएल राहुलने इंग्लंडच्या मैदानावर टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्या 1000 धावा पुर्ण केल्या आहेत. इंग्लंडमध्ये 1000 धावा पुर्ण करणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे.तसेच इंग्लंडमध्ये हा पल्ला गाठत त्याने दिंग्गजांच्या पक्तीत स्थान मिळवलं आहे.
इंग्लंडच्या मैदानावर 1000 धावा पूर्ण करणारा केएल राहुल पाचवा खेळाडू ठरला आहे. तर सर्वांधिक धावा ठोकण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.सचिन तेंडुलकरने इंग्लंडमध्ये 1575 धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकर नंतर दुसऱ्या स्थानी राहुल द्रविड आहे. राहुल द्रविडने इंग्लंडमध्ये 1376 धावा केल्या आहेत. यानंतर टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांचा नंबर लागतो, त्यांनी इंग्लंडमध्ये 1152 धावा केल्या आहेत. गावस्कर यांच्यानंतर विराट कोहलीचा चौथ्या स्थानी नंबर लागतो.विराट कोहलीने इंग्लंडमध्ये 1096 धावा केल्या आहे.त्याच्यानंतर आता केएल राहुल पाचव्या स्थानी आहे.
advertisement
Indians with 1,000 Test runs in England:
Sachin Tendulkar - 1,575.
Rahul Dravid - 1,376.
Sunil Gavaskar - 1,152.
Virat Kohli - 1,096.
KL Rahul - 1,000.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 23, 2025
सुनील गावस्करांनंतर दुसरा खेळाडू
इंग्लंडमध्ये टीम इंडियाकडून सलामीवीर म्हणून सुनील गावस्कर यांनी 1152 धावा केल्या आहेत. त्यामुळे सलामीवीर म्हणून इंग्लंडमध्ये 1000 धावा पुर्ण करणारे पहिले खेळाडू ठऱले आहे. त्यांच्यानंतर 1000 धावा पुर्ण करणारा केएल राहुल दुसरा सलामीवर ठरला आहे.
advertisement
कोहलीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी
दरम्यान केएल राहुलने 1000 धावा ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवल्यानंतर आता त्याला विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.विराट कोहलीने इंग्लंडमध्ये 1096 धावा केल्या आहे. त्यामुळे केएल राहुलला आता मॅचेस्टर टेस्टमध्ये कोहलीचा हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया मालिकेपर्यंत केएल राहुल कसोटीत नियमित नव्हता. त्याला न्यूझीलंड विरूद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमधून डावलण्यात आले होते.पण रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्ध पर्थ टेस्टमध्ये खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी केएल राहुलला सलामीला पाठवले होते.त्यावेळी त्याने आपली योग्यता सिद्ध केली आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवलं होतं.
advertisement
इंग्लंड दौऱ्यावर राहुलने फक्त तीन सामन्यांमध्ये 375 धावा केल्या आहेत, मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांपूर्वी तो संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. आता उर्वरीत दोन सामन्यात तो किती धावा करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
advertisement
चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
जॅक क्राऊली, बेन डकेट,ओली पोप,जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिख, क्रिस वोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2025 5:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : इंग्लंडमध्ये KL Rahul चा क्लास, मॅचेस्टरमध्ये रचला इतिहास, सचिन तेंडुलकर राहुल द्रविडच्या पंक्तीत मिळवलं स्थान