KL Rahul : राहुलची विकेट काढली, तेच हॉस्पिटलला पोहोचले, इंग्लंडच्या 3 बॉलर्ससोबत विचित्र घडलं!

Last Updated:

इंग्लंडचा फास्ट बॉलर क्रिस वोक्स भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. मॅचच्या पहिल्या दिवशी बाऊंड्रीवर फिल्डिंग करताना वोक्सला दुखापत झाली होती.

राहुलची विकेट काढली, तेच हॉस्पिटलला पोहोचले, इंग्लंडच्या 3 बॉलर्ससोबत विचित्र घडलं!
राहुलची विकेट काढली, तेच हॉस्पिटलला पोहोचले, इंग्लंडच्या 3 बॉलर्ससोबत विचित्र घडलं!
लंडन : इंग्लंडचा फास्ट बॉलर क्रिस वोक्स भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. मॅचच्या पहिल्या दिवशी बाऊंड्रीवर फिल्डिंग करताना वोक्सला दुखापत झाली होती. 57व्या ओव्हरमध्ये करुण नायरने मारलेला शॉट अडवताना वोक्सच्या डाव्या खांद्याला लागलं, त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. या दुखापतीमुळे वोक्स उरलेल्या सामन्यात खेळू शकणार नाही, त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया इंग्लंड ऍन्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने दिली आहे.
या सामन्यामध्ये वोक्सने आतापर्यंत 14 ओव्हर बॉलिंग करून 46 रन दिल्या होत्या. तसंच त्याने केएल राहुलची महत्त्वाची विकेट घेतली होती. याशिवाय सीरिजमध्ये वोक्सची कामगिरी निराशाजनक झाली होती, वोक्सने सीरिजमध्ये फक्त 10 विकेट घेतल्या.

राहुलची विकेट घेणारे खेळाडू बाहेर

या सीरिजमध्ये केएल राहुलची विकेट घेणाऱ्या खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर जावं लागल्याचा अजब योगायोग पाहायला मिळाला आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये शोएब बशीरने केएल राहुलची विकेट घेतली, पण या सामन्यानंतर बशीर दुखापतीमुळे संपूर्ण सीरिजमधून बाहेर झाला. त्यानंतर चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये क्रिस वोक्स आणि दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, यानंतर बेन स्टोक्सही खांद्याच्या दुखापतीमुळे पाचव्या टेस्टमध्ये खेळू शकला नाही. आणि आता क्रिस वोक्स केएल राहुलची विकेट घेतल्यानंतर दुखापतग्रस्त झाला, या दुखापतीमुळे क्रिस वोक्सही उरलेल्या सामन्यात खेळू शकणार नाही.
advertisement

भारताचा 224 वर ऑल आऊट

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 224 रनवर ऑल आऊट झाला आहे. सीरिजमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या गस अटकिसनने भारताच्या 5 विकेट घेतल्या तर जॉश टंगला 3 आणि वोक्सला 1 विकेट मिळाली, तर शुभमन गिल रन आऊट झाला. भारताकडून करुण नायरने सर्वाधिक 57 रनची खेळी केली. साई सुदर्शनने 38 आणि वॉशिंग्टन सुंदरने 26 रन केले. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने पिछाडीवर आहे, त्यामुळे सीरिज 2-2 ने ड्रॉ करण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. हा सामना ड्रॉ झाला किंवा टीम इंडियाचा पराभव झाला तरी इंग्लंड ही सीरिज जिंकेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KL Rahul : राहुलची विकेट काढली, तेच हॉस्पिटलला पोहोचले, इंग्लंडच्या 3 बॉलर्ससोबत विचित्र घडलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement