Team India : जडेजा-बुमराहने केलेली चूक महागात पडली, भारताने हातात आलेली मॅच त्या क्षणी घालवली!

Last Updated:

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा फक्त 22 रननी पराभव झाला आहे. इंग्लंडने दिलेल्या 193 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची बॅटिंग गडगडली.

जडेजा-बुमराहने केलेली चूक महागात पडली, भारताने हातात आलेली मॅच त्या क्षणी घालवली!
जडेजा-बुमराहने केलेली चूक महागात पडली, भारताने हातात आलेली मॅच त्या क्षणी घालवली!
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा फक्त 22 रननी पराभव झाला आहे. इंग्लंडने दिलेल्या 193 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची बॅटिंग गडगडली, पण रवींद्र जडेजाने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या साथीने किल्ला लढवला, पण तरीही टीम इंडियापासून विजय लांब राहिला. जडेजाने 181 बॉल खेळून नाबाद 61 रन केले तर जसप्रीत बुमराह 54 बॉलमध्ये 5 रनवर आऊट झाला. 11व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मोहम्मद सिराजनेही 30 बॉल खेळून 4 रन केल्या.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनीही 14 ओव्हर खेळून काढल्या, पण बुमराह आणि जडेजाने केलेली एक चूक टीम इंडियाला चांगलीच महागात पडली. बुमराह बॅटिंगला आल्यानंतर रवींद्र जडेजा ओव्हरच्या चौथ्या बॉलला रन काढत होता, त्यामुळे बुमराहला ओव्हरमध्ये उरलेले 2 बॉलच खेळावे लागत होते. पण ब्रायडन कार्सने टाकलेल्या 61 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला बुमराहने 1 रन काढली.
advertisement
ब्रायडन कार्सच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बुमराहने रन काढल्यामुळे 62व्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा बुमराह स्ट्राईकवर आला. बेन स्टोक्सच्या या ओव्हरचे दोन बॉल बुमराहने खेळून काढले, पण तिसऱ्या बॉलला बुमराह मोठा शॉट खेळायला गेला आणि कॅच आऊट झाला. कार्सच्या ओव्हरमध्ये बुमराहने एक रन काढली नसती, तर कदाचित स्टोक्सची पूर्ण ओव्हर बुमराहला खेळावी लागली नसती, ज्यामुळे बुमराहने विकेटही गमावली नसती.
advertisement

भारताची बॅटिंग गडगडली

इंग्लंडने दिलेल्या 193 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची बॅटिंग गडगडली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हाच भारताने 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर पाचव्या दिवसाच्या पहिल्या तासाभरामध्येच पुन्हा एकदा टीम इंडियाची बॅटिंग कोसळली. ऋषभ पंत 9 रनवर, केएल राहुल 39 रनवर माघारी परतले. यानंतर वॉशिंग्टन सुंदर शून्य रनवर आणि नितीश कुमार रेड्डी 13 रनवर आऊट झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सला 3-3 विकेट मिळाल्या, तर ब्रायडन कार्सला 2, क्रीस वोक्सला 1 आणि शोएब बशीरला 1 विकेट घेण्यात यश आलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : जडेजा-बुमराहने केलेली चूक महागात पडली, भारताने हातात आलेली मॅच त्या क्षणी घालवली!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement