IND vs NZ : विकेट हर्षितची, पण चर्चा गंभीरच्या रिएक्शनची... खतरनाक बॉलने उखडला कॉनवेचा स्टंप, Video

Last Updated:

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये हर्षित राणाने जेव्हा डेवॉन कॉनवेला बोल्ड केलं, तेव्हा कॅमेरामध्ये ड्रेसिंग रूममध्ये बसलेला गौतम गंभीर दाखवला गेला.

विकेट हर्षितची, पण चर्चा गंभीरच्या रिएक्शनची... खतरनाक बॉलने उखडला कॉनवेचा स्टंप, Video
विकेट हर्षितची, पण चर्चा गंभीरच्या रिएक्शनची... खतरनाक बॉलने उखडला कॉनवेचा स्टंप, Video
राजकोट : टीम इंडियाचा फास्ट बॉलर हर्षित राणा कोच गौतम गंभीरचा फेवरेट असल्याचं वारंवार बोललं जातं. हर्षित राणावर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर स्वत: गौतम गंभीर समोर आला आणि त्याचा बचाव केला. भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा हर्षित राणा जेव्हा विकेट घेतो, तेव्हा कॅमेरा सगळ्यात आधी कोच गौतम गंभीरच्या दिशेने जातो. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये हर्षित राणाने जेव्हा डेवॉन कॉनवेला बोल्ड केलं, तेव्हाही कॅमेरामध्ये ड्रेसिंग रूममध्ये बसलेला गौतम गंभीर दाखवला गेला. हर्षितने विकेट घेतल्यानंतर गंभीरने दिलेली रिएक्शन पाहण्यासारखी होती.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजचा दुसरा सामना राजकोटमध्ये होत आहे. या सामन्यात केएल राहुलच्या शतकामुळे भारताने पहिले बॅटिंग करताना 284 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बॅटिंगला आलेल्या न्यूझीलंडने सावध सुरूवात केली. पण सहाव्या ओव्हरमध्ये हर्षित राणाने टाकलेला स्विंग बॉल डेवॉन कॉनवेला झेपला नाही आणि तो बोल्ड झाला. 16 रनवर कॉनवेला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.
advertisement
न्यूझीलंडच्या इनिंगमध्ये सहाव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला हर्षित राणाने उत्कृष्ट स्विंग बॉल टाकला, जो थेट स्टंपवर जाऊन आदळला. हर्षितला विकेट मिळताच कॅमेरा गंभीरच्या दिशेने गेला आणि गंभीरनेही टाळी वाजवून हर्षित राणाचं कौतुक केलं.
Hey Siri, play
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : विकेट हर्षितची, पण चर्चा गंभीरच्या रिएक्शनची... खतरनाक बॉलने उखडला कॉनवेचा स्टंप, Video
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement