IND vs PAK : 33 रनमध्ये काढल्या 8 विकेट, भारताच्या स्पिनरनी पाकिस्तानला नाचवलं, यापेक्षा शाळेची पोरं बरी!

Last Updated:

IND vs PAK आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. कुलदीप यादवच्या बॉलिंगसमोर पाकिस्तानच्या बॅटरनी गुडघे टेकले आहेत.

 33 रनमध्ये काढल्या 8 विकेट, भारताच्या स्पिनरनी पाकिस्तानला नाचवलं, यापेक्षा शाळेची पोरं बरी!
33 रनमध्ये काढल्या 8 विकेट, भारताच्या स्पिनरनी पाकिस्तानला नाचवलं, यापेक्षा शाळेची पोरं बरी!
दुबई : आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानच्या बॅटिंगने गुडघे टेकले आहेत. 113 रनवर पाकिस्तानने फक्त 1 विकेट गमावली होती, पण त्यानंतर 19.1 ओव्हरमध्ये पाकिस्तानचा 146 रनवर ऑलआऊट झाला आहे. पाकिस्तानने शेवटच्या 8 विकेट फक्त 33 रनमध्ये गमावल्या आहेत. कुलदीप यादव हा भारताच्या बॉलिंगचं हुकमी एक्का ठरला.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानचे दोन्ही ओपनर साहिबजादा फरहान आणि फखर झमान यांनी धमाकेदार सुरूवात केली. फरहान आणि फखर झमान यांच्यात 9.4 ओव्हरमध्ये 84 रनची पार्टनरशीप झाली, पण त्यानंतर पाकिस्तानची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. कुलदीप यादवने 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 4 विकेट घेतल्या. यातल्या 3 विकेट कुलदीपने एका ओव्हरमध्येच घेतल्या. तर अक्षर पटेलने 4 ओव्हरमध्ये 26 रन देऊन 2 विकेट मिळाल्या. तर वरुण चक्रवर्तीनेही 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन पाकिस्तानला 2 धक्के दिले. जसप्रीत बुमराहने डेथ ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन पाकिस्तानला ऑल आऊट केलं.
advertisement
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 57 रन केले. फरहानच्या या खेळीमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर फखर झमानने 35 बॉलमध्ये 46 रन केले. फखर झमानने त्याच्या इनिंगमध्ये 2 फोर आणि 2 सिक्स लगावल्या.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 33 रनमध्ये काढल्या 8 विकेट, भारताच्या स्पिनरनी पाकिस्तानला नाचवलं, यापेक्षा शाळेची पोरं बरी!
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement