राहाने वचन पाळलं! 43 वर्षांचा झाला रणबीर कपूर, लेकीने बाबाला दिलं सगळ्यात महागडं गिफ्ट, VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ranbir Kapoor Birthday : बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आज त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्याने पत्नी आलिया भट्ट आणि कन्या राहा कपूरसोबत वाढदिवस कसा साजरा केला, याचे गोड किस्से सांगितले.
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आज त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी कुटुंबाकडून, जवळच्या मित्रांकडून आणि चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. याच दरम्यान, रणबीरने त्याच्या ‘आर्क्स’ या लाईफस्टाईल ब्रँडच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने पत्नी आलिया भट्ट आणि कन्या राहा कपूरसोबत वाढदिवस कसा साजरा केला, याचे गोड किस्से सांगितले.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल बोलताना रणबीर कपूर खूपच आनंदात होता. तो म्हणाला, “हा वाढदिवस खूप शानदार होता! मी पूर्ण दिवस फक्त आलिया आणि राहासोबत घालवला. विशेष असं काही केलं नाही, पण ते माझ्यासाठी सगळं होतं.”
advertisement
पण खरी गोड बातमी त्याने पुढे सांगितली. तो म्हणाला, “राहाने मला वचन दिलं होतं की, ती मला ४३ ‘किस’ देईल आणि तिने ते पूर्ण केलं! त्यानंतर तिने माझ्यासाठी एक खूपच सुंदर कार्ड बनवलं होतं, जे पाहून मी खरंच खूप भावूक झालो. त्यामुळे हा वाढदिवस परफेक्ट होता.”
रणबीरची कुटुंबासोबत स्वीट सिंपल बर्थडे ट्रिप
advertisement
रणबीरने सांगितलं की, वाढदिवसाच्या आदल्या रात्रीपासूनच त्याचे मागचे दोन दिवस खूप छान गेले, कारण तो त्याच्या आई नीतू कपूर, आलिया आणि राहासोबत होता. तो म्हणाला, “यापेक्षा चांगल्या वाढदिवसाची मी कल्पनाही करू शकत नाही.”
Ranbir spent the whole birthday with Alia & Raha & Raha promised him 43 kisses for his birthday and made a beautiful card for him 😭❤️#RanbirKapoor pic.twitter.com/tRPnJ0C4UY
— ๑ (@vardaanforu) September 28, 2025
advertisement
सूत्रांनुसार, रणबीर आणि त्याचे कुटुंब नुकतेच एका छोट्या सुट्टीवर गेले होते आणि आज सकाळीच प्रायव्हेट चार्टरने ते मुंबईत परतले. या सुट्टीबद्दल बोलताना रणबीर म्हणाला, “ही सुट्टी खूप चांगली होती. थोडं काम आणि थोडी सुट्टी असं कॉम्बिनेशन होतं. आम्ही नवीन घरात शिफ्ट होत आहोत, त्यामुळे थोडी होम शॉपिंग करायची होती. योगायोगाने ही ट्रिप माझ्या वाढदिवसाच्या वेळीच झाली, ज्यामुळे ते एकदम जुळून आलं.”
advertisement
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रणबीर कपूर लवकरच ‘लव्ह अँड वॉर’ मध्ये पत्नी आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत दिसणार आहे. याव्यतिरिक्त, नितेश तिवारींच्या ‘रामायण’चा पहिला भाग पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 9:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
राहाने वचन पाळलं! 43 वर्षांचा झाला रणबीर कपूर, लेकीने बाबाला दिलं सगळ्यात महागडं गिफ्ट, VIDEO VIRAL