शेअर बाजारातील Inside Story, 19 स्टॉक्सवर आले मोठे अपडेट्स; उद्या होऊ शकते तगडी कमाई

Last Updated:

Share Market Prediction: सोमवार 29 सप्टेंबर रोजी शेअरबाजारात 19 कंपन्यांशी संबंधित मोठे अपडेट्स समोर येणार आहेत. या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांना जोरदार कमाईची संधी मिळू शकते.

News18
News18
मुंबई: सोमवार 29 सप्टेंबर रोजी शेअर बाजारात 19 कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर राहू शकतात. या कंपन्यांशी संबंधित मोठे अपडेट्स समोर आले आहेत. काही कंपन्यांनी नवे प्रोजेक्ट्स, मॅनेजमेंट बदल आणि गुंतवणुकीच्या घोषणा केल्या आहेत, तर काहींवर सरकारी नोटिस किंवा अपघातांच्या बातम्या आल्या आहेत. या सर्व घटनांचा शेअर्सच्या किंमतीवर परिणाम दिसू शकतो.
advertisement
टाटा मोटर्स
टाटा मोटर्सने पॅसेंजर आणि कमर्शियल व्हेईकल बिझनेसच्या डीमर्जरची प्रभावी तारीख 1 ऑक्टोबर 2025 निश्चित केली असून NCLT कडून मंजुरी मिळाली आहे. कंपनीने शुक्रवारी मॅनेजमेंट बदलाची घोषणा करत शैलेश चंद्रा यांची एप्रिल 2026 पासून CEO आणि MD म्हणून नियुक्ती केली आहे. तर CFO पी.बी. बालाजी यांनी राजीनामा देत 17 नोव्हेंबरपासून JLR ऑटोमोटिव्ह यूकेचे CEO पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी धीमन गुप्ता नवे CFO बनतील.
advertisement
जिंदाल स्टील लिमिटेड
जिंदाल स्टीलने ओडिशातील अंगुल प्लांटमध्ये 5 एमटीपीए क्षमतेचा नवा ब्लास्ट फर्नेस सुरू केला आहे. यामुळे कंपनीची हॉट मेटल उत्पादन क्षमता 4 एमटीपीए वरून 9 एमटीपीएपर्यंत वाढली आहे.
श्रीराम फायनान्स
advertisement
श्रीराम फायनान्सने आपल्या 100% सबसिडियरी कंपनी श्रीराम ओव्हरसीजमध्ये राईट्स इश्यूद्वारे 300.05 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही पावले त्याची भांडवली क्षमता मजबूत करण्यासाठी उचलण्यात आली आहेत.
article_image_1
वॉरी एनर्जीज (Waaree Energies)
advertisement
वॉरी एनर्जीजने जाहीर केले की- त्याची सबसिडियरी Waaree Power Private Limited (WPPL) ने Racemosa Energy (India) प्रायव्हेट लिमिटेडमधील 76% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी करार केला आहे. या अधिग्रहणावर सुमारे 53 कोटी रुपये खर्च होणार आहेत. शुक्रवारी कंपनीचा शेअर 7.12% घसरून 3,199.90 रुपयांवर बंद झाला.
advertisement
आयआरएफसी (IRFC)
सरकारी कंपनी IRFC ने पतरातू विद्युत उत्पादन निगम लिमिटेड (PVUNL) ला झारखंडच्या लातेहार जिल्यातील बनहरडीह कोल ब्लॉकच्या विकासासाठी 3,388.51 कोटी रुपयांचे कर्ज सहाय्य दिले आहे. PVUNL ही NTPC ची सबसिडियरी असून पतरातूत 4,000 मेगावॅटचा कोल-बेस्ड पॉवर प्रोजेक्ट दोन टप्प्यांमध्ये बांधत आहे.
advertisement
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकेला दुबईत धक्का बसला आहे. बँकेने कळवले की तिच्या DIFC शाखेला दुबई फायनान्शियल सर्व्हिसेस अथॉरिटी (DFSA) कडून नोटीस मिळाली आहे. यात 25 सप्टेंबर 2025 पर्यंत नवे क्लायंट्स ऑनबोर्डिंग पूर्ण न केल्यास 26 सप्टेंबरपासून काही फायनान्शियल सर्व्हिसेसवर बंदी घालण्यात येईल असे म्हटले आहे.
अल्केम लॅबोरेट्रीज
अल्केम लॅबोरेट्रीजने आपला ट्रेड जेनेरिक्स बिझनेस स्वतःच्या सबसिडियरी कंपनी Alkem Wellness ला ट्रान्सफर करण्यासाठी बिझनेस ट्रान्सफर करार केला आहे. हा बदल 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल.
बिर्लासॉफ्ट लिमिटेड
बिर्लासॉफ्ट लिमिटेडने घोषणा केली की- अंगन गुहा यांची पुढील दोन वर्षांसाठी कंपनीचे CEO आणि MD म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 1 डिसेंबर 2025 पासून प्रभावी होईल, ज्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने नॉमिनेशन आणि रेम्युनरेशन कमिटीच्या शिफारशीवर आणि रेग्युलेटरी मंजुरीनंतर मान्यता दिली आहे.
पीजी इलेक्ट्रोप्लास्ट
पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या सबसिडियरी पीजी टेक्नोप्लास्टने आंध्र प्रदेशातील श्री सिटीमध्ये 50 एकर जमीन 1,000 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. येथे डिसेंबर 2026 पर्यंत 1.2 मिलियन रेफ्रिजरेटर तयार करण्याची योजना आहे तसेच भविष्यात आणखी विस्तार होणार आहे.
चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स
चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्सवर CGST आणि IGST कायद्याअंतर्गत पटना-1 येथील जॉइंट कमिशनरने एकूण 527 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बीईएल (BEL)
भारतीय सेनेने पृष्ठभाग ते आकाश अशा प्रकारच्या ‘अनंत शस्त्र’ या क्षेपणास्त्र प्रणालीच्या 5 ते 6 रेजिमेंट खरेदीसाठी टेंडर जारी केले आहे, जे सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) ला देण्यात आले आहे. ही प्रणाली DRDO ने विकसित केली आहे.
लेमन ट्री हॉटेल्स
लेमन ट्री हॉटेल्सने आपल्या मॅनेजमेंटमध्ये मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. 1 ऑक्टोबरपासून पंतजलि केसवानी हे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन बनतील. तर नीलेंद्र सिंह यांची एमडी म्हणून आणि कपिल शर्मा यांची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरCFO म्हणून नियुक्ती झाली आहे.
आजाद इंजिनियरिंग
आजाद इंजिनियरिंगला मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजकडून टर्बाईन एअरफॉयल्ससाठी 73.47 मिलियन डॉलर (651 कोटी) चा नवा करार मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांत दोन्ही कंपन्यांमधील डील्सची एकूण किंमत 156.36 मिलियन डॉलर (1,387 कोटी) झाली आहे.
गोदरेज अॅग्रोवेट लिमिटेड
गोदरेज अॅग्रोवेटने फूड प्रोसेसिंग मंत्रालयासोबत 960 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी एमओयू साइन केला आहे. या गुंतवणुकीतून फूड प्रोसेसिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि अपस्ट्रीम इनोव्हेशन सुविधा उभारल्या जातील. ही घोषणा वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये करण्यात आली.
वसकॉन इंजिनिअर्स
कंपनीने अदानी इन्फ्रासोबत एमओयू साइन केला आहे. याअंतर्गत मुंबईतील तीन प्रोजेक्ट्समध्ये (एकूण 13.15 मिलियन चौरस फूट) डिझाईनपासून एक्झिक्युशनपर्यंत सहकार्य केले जाणार आहे. शुक्रवारी शेअर 5.24% घसरून 57.86 रुपयांवर बंद झाला.
ऑईल इंडिया लिमिटेड
ऑईल इंडिया लिमिटेडने अंडमान शॅलो ऑफशोअर ब्लॉकमधील विजयपुरम-2 एक्सप्लोरेटरी वेलमध्ये नैसर्गिक वायूचा शोध लावला आहे. प्राथमिक टेस्टिंगमध्ये इनफ्लोजची पुष्टी झाली आहे आणि कंपनी आता त्याची क्षमता तपासणार आहे.
ब्रिगेड एंटरप्रायझेस
ब्रिगेड एंटरप्रायझेसने तेलंगणातील कोकापेट येथे 1.35 एकर जमीन आपल्या सबसिडियरी कंपनी ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्सला 110.14 कोटी रुपयांना विकली आहे. ही डील सबसिडियरीच्या IPO उद्दिष्टांचा भाग आहे.
मराठी बातम्या/मनी/
शेअर बाजारातील Inside Story, 19 स्टॉक्सवर आले मोठे अपडेट्स; उद्या होऊ शकते तगडी कमाई
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement