ICC च्या दणक्यानंतर नरमला साहिबजादा फरहान, माजही उतरला, मस्तीही जिरली, अर्धशतक ठोकूनही गपगार राहिला

Last Updated:

पाकिस्तानचा साहिबजादा फरहानने आपल्या 50 धावा पुर्ण केल्या होत्या. या अर्धशतकानंतर साहिबजादाने वादग्रस्त सेलिब्रेशन टाळले आहे.त्यामुळे त्याच्या सेलिब्रेशनची चर्चा आहे.

sahibzada farhan
sahibzada farhan
India vs Pakistan Asia Cup Final :आशिया कपच्या फायनल सामन्यात पाकिस्तानने आक्रामक खेळीने सूरूवात केली आहे. या सामन्यात पॉवरप्ले मध्येच पाकिस्तानने एकही विकेट न गमावता 45 धावा केल्या होत्या. यानंतर पाकिस्तानचा साहिबजादा फरहानने आपल्या 50 धावा पुर्ण केल्या होत्या. या अर्धशतकानंतर साहिबजादाने वादग्रस्त सेलिब्रेशन टाळले आहे.त्यामुळे त्याच्या सेलिब्रेशनची चर्चा आहे.
पाकिस्तानकडून सलामीला उतरलेल्या साहिबजादा फरहानने 36 बॉलमध्ये 51 धावा केल्या होत्या. हे अर्धशतक ठोकल्यानंतर फरहाने कोणतेही वादग्रस्त सेलिब्रेशन न करता गपगारपणे बॅट उंचावून पुन्हा खेळायला सूरूवात केली होती.त्यामुळे आयसीसीने कारवाई केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू नरमला होता.
याआधीच्या सामन्यात भारताविरूद्ध साहिबजादा फरहानने अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने AK 47 चं सेलिब्रेशन केले होते. पाकिस्तानी खेळाडूंचं हे सेलिब्रेशन प्रचंड वादात सापडलं होतं.बीसीसीआयने देखील या प्रकरणी आयसीसीकडे तक्रार केली होती. य तक्रारीनंतर फरहानला वॉर्निंग देण्यात आला होता.त्यासोबत एक डीमेरीट पॉईंट देखील दिले होते.
advertisement
दरम्यान फायनल सामन्यात अर्धशतक ठोकल्यानंतर साहिबजादा फरहान हा 38 बॉलमध्ये 57 धावा करून बाद झाला आहे. या खेळीच त्याने 3 षटकार आणि 5 चौकार लगावले होते. फरहानच्या पाठोपाठ पाकिस्तानचे आणखी तीन विकेट पडल्या आहेत.त्यामुळे 15 ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या 126 धावा झाल्या आहेत.
हॅरीस रौफवर दंडात्मक कारवाई
फरहाण सोबत हॅरीस रौफने देखील मैदानात वादग्रस्त अॅक्शन केली होती.या अॅक्शन नंतक आयसीसीने रौफला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावला होता.त्यासोबत एक डिमेरीट पॉइंटही दिला होता.
advertisement
भारताची प्लेइंग इलेव्हन :
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन(विकेटकिपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन):
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकिपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ICC च्या दणक्यानंतर नरमला साहिबजादा फरहान, माजही उतरला, मस्तीही जिरली, अर्धशतक ठोकूनही गपगार राहिला
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement