28 किमी मायलेज, Maruti ची जबरदस्त कार आता 1.13 लाखाने झाली स्वस्त!
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहेत. मारुतीची मिड क्रास एसयूव्ही maruti suzuki fronx ची किंमत कमी झाली आहे.
GST च्या दरात कपात झाली असून सर्वत्र स्वस्ताईचं वातावरण आहे. आता २८ टक्के स्लॅब हा रद्द झाला आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात किंमती कमी झाल्या आहे. खास करून ऑटो सेक्टरमध्ये याचे चांगले पडसाद पाहण्यास मिळत आहे. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहेत. मारुतीची मिड क्रास एसयूव्हीmaruti suzuki fronx ची किंमत कमी झाली आहे. ही कार आता तब्बल 1.13 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.
advertisement
मारुती सुझुकीची फ्राँक्स लवकरच हायब्रिड प्रकारात लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मारुतीने या कारच्या किंमतीत कपात केली होती. आता जीएसटीतील बदलामुळे १,१२, ६०० रुपयांची कपात झाली आहे. या कारची किंमत आता ६,२३,८०० एक्स शोरूम इतकी असणार आहे. या कारमध्ये५ व्हॅरिएंट उपलब्ध असतील. यामध्ये पेट्रोल मॅन्युअल, पेट्रोल ऑटोमॅटिक आणि टर्बो पेट्रोल व्हॅरिएंट्सचा समावेश आहे.
advertisement
advertisement
फीचर्स फ्राँक्स ही एक अतिशय स्टायलिश कार असून ड्युएल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात बसवलेलं 1.0-लिटर टर्बो बूस्टरजेट पेट्रोल इंजिन खूप शक्तिशाली आहे. ते 5.3 सेकंदात ताशी 0 ते 60 किलोमीटरपर्यंत वेग नेऊ शकतं. अॅडव्हान्स्ड 1.2-लिटर के-सीरिज, ड्युएल जेट, ड्युएल व्हीव्हीटी इंजिन शहरात आणि लाँग ड्राइव्हवर उत्तम परफॉर्मन्स देते. हे इंजिन स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह मिळते. ते इंजिन पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेलं आहे. त्यात ऑटो गिअर शिफ्टचा पर्यायही उपलब्ध आहे. ही कार एका लिटर पेट्रोलवर 23 किलोमीटरपर्यंत धावते.
advertisement
या कारमध्ये लेदर रॅप्ड स्टीअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले, ड्युअल-टोन एक्सटिरिअर कलर, वायरलेस चार्जर, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, 6-स्पीकर, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर एसी व्हॅंट्स, फास्ट यूएसबी चार्जिंग पॉइंट, कनेक्टेड कार फीचर्स, रियर व्ह्यू कॅमेरा आणि 9-इंचाची टचस्क्रीन यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत.
advertisement
advertisement