IND vs PAK : पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानची दाणादाण, हार्दिकने घेतलं गोल्डन डक, बुमराहनेही सोडलं नाही

Last Updated:

आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला पहिल्याच बॉलला विकेट मिळाली आहे. पाकिस्तानचा ओपनर सॅम अयुब पहिल्याच बॉलला आऊट झाला.

पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानची दाणादाण, हार्दिकने घेतलं गोल्डन डक, बुमराहनेही सोडलं नाही
पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानची दाणादाण, हार्दिकने घेतलं गोल्डन डक, बुमराहनेही सोडलं नाही
दुबई : आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला पहिल्याच बॉलला विकेट मिळाली आहे. पाकिस्तानचा ओपनर सॅम अयुब पहिल्याच बॉलला आऊट झाला. हार्दिक पांड्याने टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. मॅचचा पहिला बॉल हार्दिकने वाईड टाकला, त्यामुळे टीम इंडियाला पहिल्याच अधिकृत बॉलवर भारताला विकेट मिळवून दिली. हार्दिकच्या बॉलवर सॅम अयुबने पॉईंटच्या दिशेने हवेत शॉट मारला, पण जसप्रीत बुमराहने त्याचा कॅच पकडला. टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचच्या पहिल्याच अधिकृत बॉलवर विकेट घेणारा हार्दिक पांड्या टीम इंडियाचा दुसरा बॉलर ठरला आहे. याआधी अर्शदीप सिंगने युएसएविरुद्ध टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पहिल्याच बॉलला विकेट घेतली होती. अर्शदीपने पहिल्याच बॉलला शयन जहांगिरची विकेट घेतली होती.

सॅम अयुब दोनदा गोल्डन डक

सॅम अयुबचं आशिया कपच्या 2 सामन्यांमधलं हे दुसरं गोल्डन डक आहे. याआधी ओमानविरुद्धच्या सामन्यातही सॅम अयुब पहिल्याच बॉलवर शून्य रनवर आऊट झाला होता. शाह फैसलने सॅम अयुबला एलबीडल्ब्यू आऊट केलं होतं.

हार्दिकनंतर बुमराहचाही धक्का

हार्दिक पांड्याने पहिल्याच ओव्हरला पाकिस्तानला धक्का दिल्यानंतर दुसऱ्या ओव्हरला बुमराहनेही विकेट मिळवली. मोहम्मद हॅरिसने बुमराहच्या बॉलिंगवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिक पांड्याने त्याचा कॅच पकडला. 5 बॉलमध्ये 3 रन करून मोहम्मद हॅरिस आऊट झाला.
advertisement

पाकिस्तानने टॉस जिंकला

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने कोणताही बदल केलेला नाही.

भारतीय टीम

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानची दाणादाण, हार्दिकने घेतलं गोल्डन डक, बुमराहनेही सोडलं नाही
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement