IND vs PAK : वैभव, आयुष अपयशी ठरले, मग 18 वर्षांचा खेळाडू पाकिस्तानला एकटाच भिडला, गोलंदाजांच्या नाकात दम केला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानचे गोलंदाज भारताच्या फलंदाजांवर हावी ठरत असताना तिकडे भारताचा 18 वर्षीय खेळाडू एकटाच नडला.पाकिस्तानला त्याने एकट्यानेच भिडून भारताचा डाव सावरला होता.
India vs Pakistan : आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपच्या सामन्यात आज पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून भारताचे धडाधड विकेट काढले होते. यामध्ये वैभव सूर्यवंशी आणि आयुश म्हात्रे यांसारखे सर्व खेळाडू अपयशी ठरले होते. त्यामुळे एकीकडे पाकिस्तानचे गोलंदाज भारताच्या फलंदाजांवर हावी ठरत असताना तिकडे भारताचा 18 वर्षीय खेळाडू एकटाच नडला.पाकिस्तानला त्याने एकट्यानेच भिडून भारताचा डाव सावरला होता.त्यामुळे भारताचा डाव सावरला होता.
पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती. टीम इंडियाकडून आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले होते. पण दोन्ही खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नाही. वैभव सूर्यवंशी 30 धावांवर बाद झाला.त्याच्या पाठोपाठ कर्णधार आयुश म्हात्रे शुन्यावर बाद झाला,त्यानंतर लगेचच ऑरोन जॉर्ज 16 वर बाद झाला. भारताच्या या तीनही विकेट 47वर पडल्या होत्या.
advertisement
टीम इंडियाचे हे तीन खेळाडू बाद झाल्यानंतर 18 वर्षांचा वेदांत त्रिवेदी मैदानात आला, यावेळी त्याच्यासोबत विहान मल्होत्रा मैदानात होता. यावेळ वेदांतने संयमीपणे मैदानात टीचून खेळायला सूरूवात केली.या दरम्यान दुसऱ्या बाजूने भारताच्या विकेट पडतच होत्या. विहान मल्होत्रा 21 तर अभिग्यान कुंडू 16 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर वेदांत त्रिवेदीने एकट्याने पाकिस्तानशी भिडून 68 धावांची खेळी केली. जिकडे सगळेच खळाडू फेल ठरत होते तिकडे वेदांतने अर्धशतकीय खेळी केली.या खेळीच्या बळावर भारत 200 च्या आसपास पोहोचला होता.
advertisement
त्यानंतर शेवटच्या क्षणी आर अम्बरीशने 29, खिलान पटेलने 21 धावा आणि कनिश्क चौहाने 35 धावांची खेळी केली.या खेळीच्या बळावर भारत 252 धावांवर ऑल आऊट झाली होती.
पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने प्रत्येकी 3,मोहम्मद सय्यामने 2 आणि अली राजा,अहमद हुसने, मोमीन कमार आणि अली हसन बलोचने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 5:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : वैभव, आयुष अपयशी ठरले, मग 18 वर्षांचा खेळाडू पाकिस्तानला एकटाच भिडला, गोलंदाजांच्या नाकात दम केला






