IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने घरात घुसून मारलं, गंभीरने पुन्हा 'धोका' दिला, टीम इंडियाच्या पराभवाचे 5 व्हिलन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 124 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा फक्त 93 रनवर ऑलआऊट झाला.
कोलकाता : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 124 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा फक्त 93 रनवर ऑलआऊट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या सिमन हार्मरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या याआधी हार्मरने पहिल्या इनिंगमध्येही 4 विकेट घेतल्या होत्या, त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
मागच्या एका वर्षात टीम इंडियाने भारतामध्ये 6 टेस्ट मॅच खेळल्या आहेत, यातल्या 4 टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. मागच्या वर्षी न्यूझीलंडने भारताचा भारतामध्ये 3-0 ने पराभव केला, यानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही टीम इंडियाला धूळ चारली आहे. एकेकाळी घरच्या मैदानात वाघ असलेल्या टीम इंडियाची अवस्था मागच्या वर्षभरात बिकट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवाला टीम इंडियाचे 5 जण कारणीभूत ठरले आहेत.
advertisement
गौतम गंभीरची प्रयोगशाळा
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय टीमची प्रयोगशाळा झाली आहे, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. या सामन्यातही भारतीय टीम 3 ऑलराऊंडर घेऊन मैदानात उतरली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या इनिंगमध्ये 55 ओव्हर तर दुसऱ्या इनिंगमध्ये 54 ओव्हर बॅटिंग केली. संपूर्ण सामन्यात भारतीय बॉलरना फक्त 109 ओव्हर बॉलिंग करायला लागली, पण त्यासाठी टीमकडे सहा बॉलिंग पर्याय उपलब्ध होते. ज्याचा वापरही टीम इंडियाला करता आला नाही.
advertisement
गिलने मागितला स्पिनिंग ट्रॅक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने स्पिन बॉलिंगला मदत करणारी खेळपट्टी मागितली, अशी प्रतिक्रिया क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली आहे. न्यूझीलंडविरुद्ध अशाच खेळपट्टीवर पराभव झालेला माहिती असतानाही कर्णधार गिलने कोलकात्यामध्ये स्पिन बॉलिंगसाठी खेळपट्टी का मागितली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जुरेल-पंतने विकेट फेकली
कोलकात्याच्या या खेळपट्टीवर टिकून खेळणं महत्त्वाचं होतं, कारण कर्णधार गिल बॅटिंगला येणार नाही, हे भारतीय बॅटरना माहिती होतं, तरीही ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत यांनी त्यांच्या विकेट फेकल्या. हार्मरच्या बॉलिंगवर जुरेल मोठा फटका मारायला गेला आणि कॉर्बिन बॉशने डीप मिड विकेटवर त्याचा कॅच पकडला. 1 रनवरच भारताचे दोन्ही ओपनर आऊट झाले होते, त्यामुळे जुरलेला सावध खेळण्याची गरज होती, पण तरीही त्याने टीमचा स्कोअर 33 असताना चुकीचा फटका खेळला.
advertisement
दुसरीकडे दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या ऋषभ पंतनेही हार्मरच्या बॉलिंगवर त्यालाच सोपा कॅच दिला. ऋषभ पंत क्रीजवर असेपर्यंत भारतीय चाहत्यांना विजयाच्या अपेक्षा होत्या, पण तोदेखील आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची शेवटची आशाही संपुष्टात आली.
बॉलर बॅटिंगमध्ये पुन्हा फेल
मागच्या बऱ्याच काळापासून टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे बॉलर बॅटिंगमध्ये सतत अपयशी ठरत आहेत. इंग्लंड दौऱ्यामध्येही भारतीय बॉलरनी बॅटिंगमध्ये अजिबात मदत केली नाही. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही कुलदीप यादव एक रनवर, मोहम्मद सिराज शून्य रनवर आऊट झाला, तर बुमराह शून्य रनवर नाबाद राहिला. याआधी पहिल्या इनिंगमध्ये कुलदीप यादव 1 आणि सिराज 1 रन वर आऊट झाला. तर बुमराह 1 रनवर नाबाद राहिला.
advertisement
दुसरीकडे आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर मार्को यानसनने 13 तर नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या कॉर्बिन बॉशने 25 रनची खेळी केली, ज्याचा फटका टीम इंडियाला बसला.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
November 16, 2025 3:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने घरात घुसून मारलं, गंभीरने पुन्हा 'धोका' दिला, टीम इंडियाच्या पराभवाचे 5 व्हिलन!


