Team India : 16 सामन्यांमध्ये मेहरबानी, 17व्यामध्ये गोल्डन डक, वर्ल्ड कपला 'प्रिन्स'च टीम इंडियाला धोका देणार!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपला फक्त 58 दिवस शिल्लक असताना टीम इंडियासमोरच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. टीमचा उपकर्णधार शुभमन गिल हा पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे.

16 सामन्यांमध्ये मेहरबानी, 17व्यामध्ये गोल्डन डक, वर्ल्ड कपला 'प्रिन्स'च टीम इंडियाला धोका देणार!
16 सामन्यांमध्ये मेहरबानी, 17व्यामध्ये गोल्डन डक, वर्ल्ड कपला 'प्रिन्स'च टीम इंडियाला धोका देणार!
मुल्लानपूर : टी-20 वर्ल्ड कपला फक्त 58 दिवस शिल्लक असताना टीम इंडियासमोरच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. टीमचा उपकर्णधार शुभमन गिल हा पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शुभमन गिल पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला आहे. याआधी पहिल्या सामन्यात गिल 2 बॉलमध्ये 4 रन करून माघारी परतला होता. मागच्या 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शुभमन गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाहीये.
सप्टेंबर महिन्यात आशिया कपच्या वेळी शुभमन गिलचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं, याचसोबत त्याला टी-20 टीमचं उपकर्णधारही करण्यात आलं. गिलचं टीममध्ये कमबॅक झाल्यामुळे संजू सॅमसनला त्याची ओपनिंगची जागा सोडून मिडल ऑर्डरला बॅटिंग करावी लागली, पण संजू मिडल ऑर्डरमध्ये अपयशी ठरला आणि टीमबाहेरही गेला, पण गिल मात्र लागोपाठ 17 सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतरही त्याला संधी मिळत आहे.
advertisement
शुभमन गिलने 35 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 28.03 च्या सरासरी आणि 138.72 च्या स्ट्राईक रेटने 841 रन केले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलच्या नावावर 3 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. गिलने केलेलं हे शतक न्यूझीलंडविरुद्ध आलं आहे, तर तीन अर्धशतकांपैकी दोन अर्धशतकं झिम्बाब्वे आणि एक वेस्ट इंडिजविरुद्ध आलं आहे. गिलचं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं शेवटचं अर्धशतक 13 जुलै 2024 ला झिम्बाब्वेविरुद्ध आलं होतं.
advertisement
गिलचा मागच्या 17 टी-20 मधला स्कोअर
मागच्या 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलने 13, 34, 39, 20, 10, 5, 47, 29, 4, 12, 37, 5, 15, 12, 46, 29, 4, 0 असा आहे. या 16 सामन्यांमध्ये गिलला फक्त 5 वेळा 30 रनचा आकडा पार करता आला आहे, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपआधी शुभमन गिलची ही कामगिरी टीम इंडियाची चिंता वाढवणारी नक्कीच आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 16 सामन्यांमध्ये मेहरबानी, 17व्यामध्ये गोल्डन डक, वर्ल्ड कपला 'प्रिन्स'च टीम इंडियाला धोका देणार!
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement