IND vs SA : ऑस्ट्रेलियाला धुतलं, आता WTC चॅम्पियनचं चॅलेंज, भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजचं टाईमटेबल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता टीम इंडियासमोर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप विजेत्या दक्षिण आफ्रिकेचं चॅलेंज आहे. दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 19 डिसेंबरला संपणार आहे.
मुंबई : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे, वनडे सीरिजमध्ये कांगारूंनी भारताला 2-1 ने हरवल्यानंतर टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाने दणक्यात कमबॅक केलं. 5 मॅचच्या या सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने विजय झाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता टीम इंडियासमोर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप विजेत्या दक्षिण आफ्रिकेचं चॅलेंज आहे. दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 19 डिसेंबरला संपणार आहे. दोन्ही टीममध्ये 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज होईल.
14 नोव्हेंबरपासून टेस्ट सीरिज
14 नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरूवात होईल. पहिली टेस्ट 14 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डनमध्ये होईल, तर दुसरी टेस्ट 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये खेळवली जाईल.
टेस्ट सीरिज संपल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान वनडे सीरिज होईल. या सीरिजसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माचं टीम इंडियामध्ये कमबॅक होईल. वनडे सीरिज संपल्यानंतर 9 डिसेंबर ते 19 डिसेंबरदरम्यान 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाईल. फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे, त्याआधी होणारी ही सीरिज दोन्ही टीमच्या वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या सीरिजमध्ये दोन्ही देशांच्या वर्ल्ड कपसाठीच्या टीम निश्चित होण्याची शक्यता आहे.
advertisement
टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीम
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, केएल राहुल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव
कुठे पाहता येणार मॅच?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या या सीरिजच्या सर्व मॅच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. तसंच सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग जियो हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर केलं जाणार आहे.
advertisement
किती वाजता सुरू होणार मॅच?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टेस्ट सकाळी 9.30 वाजता तर दुसरी टेस्ट सकाळी 9.00 वाजता सुरू होईल. सीरिजच्या तीनही वनडे दुपारी 1.30 वाजता तर पाचही टी-20 मॅच संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत.
टेस्ट सीरिज
पहिली टेस्ट : 14 ते 18 नोव्हेंबर- कोलकाता
दुसरी टेस्ट : 22 ते 26 नोव्हेंबर- गुवाहाटी
advertisement
वनडे सीरिज
पहिली वनडे : 30 नोव्हेंबर- रांची
दुसरी वनडे : 3 डिसेंबर- रायपूर
तिसरी वनडे : 6 डिसेंबर- विशाखापट्टणम
टी-20 सीरिज
पहिली टी-20 : 9 डिसेंबर- कटक
दुसरी टी-20 : 11 डिसेंबर- चंडीगड
तिसरी टी-20 : 14 डिसेंबर- धर्मशाला
चौथी टी-20 : 17 डिसेंबर- लखनऊ
पाचवी टी-20 : 19 डिसेंबर- अहमदाबाद
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 9:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : ऑस्ट्रेलियाला धुतलं, आता WTC चॅम्पियनचं चॅलेंज, भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजचं टाईमटेबल!


