IND vs WI 2nd Test : बॉल भोवऱ्यासारखं फिरला अन् 8.4 चा डिग्रीचा टर्न पाहून KL Rahul शॉक, पाहा Video

Last Updated:

IND vs WI Delhi Test : जोमेल वॉरिकनने 18 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर असा बॉल टाकला की, बॉल एक दोन डिग्री नाही तर तब्बल 8.4 डिग्रीने वळाला.

IND vs WI 2nd Test KL Rahul
IND vs WI 2nd Test KL Rahul
KL Rahul Wicket : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा (IND vs WI 2nd Test) आणि मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळवला जात आहे. दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर हा सामना होत असताना टीम इंडियाला गुड न्यूज मिळाली. सलग सहा टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा शुभमन गिलने (Shubhman Gill) कॅप्टन्सीमध्ये टॉस जिंकला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये 94 धावा केल्या आहे. तर एक विकेट संघाचा गमावावी लागली.

केएल राहुलची विकेट खास 

केएल राहुलच्या रूपात भारताने आपला पहिला बळी गमावला. केएल राहुल 54 बॉलमध्ये 38 धावा काढून बाद झाला. पण केएल राहुलची विकेट वेस्ट इंडिजसाठी खास राहिली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.जोमेल वॉरिकनच्या गोलंदाजीवर तो विकेटकिपर टेविन इमलाचने स्टंपिंग केली. भारताने 18 ओव्हरमध्ये 62 धावांवर आपला पहिला बळी गमावला.
advertisement

8.4 डिग्री बॉल वळाला अन्...

पण केएल राहुलला टाकलेला बॉल साधा नव्हता. जोमेल वॉरिकनने 18 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर असा बॉल टाकला की, बॉल एक दोन डिग्री नाही तर तब्बल 8.4 डिग्रीने वळाला. केएल राहुल हा बॉल स्टेप आऊट करून खेळायला गेला अन् मागे विकेटकीपरने कोणतीही चूक केली नाही.
advertisement
advertisement
advertisement
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (C), ध्रुव जुरेल (WK), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंद्रपॉल, ॲलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेस (C), टेविन इम्लाच (WK), जस्टिन ग्रीव्हस, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, अँडरसन फिलिप, जेडेन सील्स.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI 2nd Test : बॉल भोवऱ्यासारखं फिरला अन् 8.4 चा डिग्रीचा टर्न पाहून KL Rahul शॉक, पाहा Video
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement