फोर मारली तरी आऊट दिलं! IND vs AUS सामन्यात इंजमाम मुमेंट, मैदानात ड्रामा, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये भारतीय महिला टीमचा 2-1 ने विजय झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात मैदानामध्ये मोठा ड्रामा झाला.
ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये भारतीय महिला टीमचा 2-1 ने विजय झाला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय महिला टीमने 21 रननी विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 19 रनने पराभव झाला, यानंतर आता तिसऱ्या टी-20 मध्ये भारतीय महिला टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 रनने विजय मिळवत सीरिजही खिशात टाकली आहे. स्मृती मानधना टीम इंडियाच्या या विजयाची शिल्पकार ठरली. स्मृतीने 55 बॉलमध्ये 82 रनची खेळी केली, ज्यात 8 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.
स्मृतीशिवाय जेमिमा रॉड्रिग्जनेही अर्धशतक झळकावलं. जेमिमाने 46 बॉलमध्ये 59 रन केले. स्मृती आणि जेमिमाच्या अर्धशतकांमुळे भारताने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 176/6 पर्यंत मजल मारली. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 159/9 पर्यंत मजल मारता आली.
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. 16 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 130-6 असा होता, त्यामुळे 4 ओव्हरमध्ये त्यांना विजयासाठी 46 रनची गरज होती. सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो अशी परिस्थिती असताना कर्णधार हरमनप्रीत कौरने श्री चरणीच्या हातात बॉल दिला आणि ग्रेस हॅरिसने मिड विकेटच्या दिशेने फोर मारली, पण तरीही ती आऊट झाली.
advertisement
Hit wicket
Grace Harris goes in rare fashion! pic.twitter.com/UHx4DNAUdW
— 7Cricket (@7Cricket) February 21, 2026
फोर मारत असताना ग्रेस हॅरिसचा पाय स्टंपला लागला, त्यामुळे तिला हिट विकेट आऊट देण्यात आलं. ग्रेस हॅरिसच्या या विकेटमुळे मैदानामध्ये काही काळ मोठा ड्रामा झाला होता. ग्रेस हॅरिसची विकेट गेल्यानंतर मात्र टीम इंडियाने सुटकेचा निश्वास टाकला.
advertisement
भारताकडून श्रेयांका पाटीलने 4 ओव्हरमध्ये फक्त 22 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर श्री चरणीलाही 3 विकेट मिळाल्या. याशिवाय अरुंधती रेड्डीला 2 आणि रेणुका सिंग ठाकूरला 1 विकेट घेण्यात यश आलं. टी-20 सीरिजनंतर आता दोन्ही टीममध्ये 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे, त्यानंतर दोन्ही टीम एक टेस्ट मॅच खेळतील. 24 फेब्रुवारीपासून वनडे सीरिजला सुरूवात होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 5:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
फोर मारली तरी आऊट दिलं! IND vs AUS सामन्यात इंजमाम मुमेंट, मैदानात ड्रामा, Video










