IND vs SA : ईडन गार्डन्सवर सन्नाटा! ऋषभ पंतनंतर जड्डूनेही खाल्ली माती, 120 मिनिटात साऊथ अफ्रिकेने फिरवली मॅच
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs South Africa : साऊथ अफ्रिकेने टीम इंडियाला दुसऱ्या डावात 124 धावांचं आव्हान दिलं होतं. हा रनचेस करताना टीम इंडियाची ढेपाळल्याचं दिसून आलंय.
IND vs SA 1st Test : पहिल्या डावानंतर टीम इंडियाने लीड घेतली होती. मात्र, साऊथ अफ्रिकेने दुसऱ्या डावात टप्प्यात बॉलिंग करत टीम इंडियाला झटपट गुंडाळलं आहे. साऊथ अफ्रिकेने टीम इंडियाला दुसऱ्या डावात 124 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता टीम इंडियाने अवघड परिस्थिती झालीये. टीम इंडियाचा 63 वर अर्धा संघ माघारी परतलाय.
ऋषभने देखील माती खाल्ली
भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करण्यासाठी आले. पहिल्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मार्को जानसेनने सलामीवीर यशस्वी जयस्वालला आऊट केलं. यशस्वीला त्याचे खातंही उघडता आले नाही. पहिल्या ओव्हरनंतर भारताची शुन्यावर एक आऊट अशी धावसंख्या होती. त्यानंतर कडवी झुंज देत असलेला ध्रुव जुरेल देखील 33 च्या धावसंख्येवर आऊट झाला. तर ऋषभने देखील लगेच माती खाल्ली. महत्त्वाच्या सामन्यात ऋषभ फक्त 2 धावा करून आऊट झाला.
advertisement
जडेजा चुकीच्या डीआरएसमुळे आऊट
त्यानंतर रविंद्र जडेजा देखील चुकीच्या डीआरएसमुळे आऊट झाला. तर कालपासून मैदानात पाय रोवणारा वॉशिंग्टन सुंदर याने देखील अखेर हत्यार टाकलं. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीवर आणि गंभीरच्या रणनितीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भारत: यशस्वी जायसवाल, केएल राहुल, वाशिंगटन सुंदर, शुभमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), रविंद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
advertisement
साउथ अफ्रीका: एडेन मार्करम, रयान रिकेल्टन, वियान मुल्डर, तेंबा बावुमा (कॅप्टन), टोनी डी जॉर्जी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरिन (विकेटकीपर), साइमन हार्मर, मार्को जानसन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
November 16, 2025 2:04 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : ईडन गार्डन्सवर सन्नाटा! ऋषभ पंतनंतर जड्डूनेही खाल्ली माती, 120 मिनिटात साऊथ अफ्रिकेने फिरवली मॅच


