IND vs SA : टेम्बा बावुमाने फेल केला हॉटेलवरच्या लंचचा प्लॅन, कोलकाता टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडिया इतक्या धावांची गरज!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs SA Kolkata test : साऊथ अफ्रिका कॅप्टन टेम्बाने टीम इंडियाला फक्त तीन विकेट घेण्यासाठी तब्बल 90 मिनिटं झुंजवलं. टेम्बाने फिफ्टी मारली.
India vs Sauth Africa 1st Test : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील कोलकाता येथील कसोटी सामन्यात टीम इंडियाला 124 धावांची विजयासाठी गरज आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साऊथ अफ्रिकेचे तीन बळी झटपट घेऊन लंच ब्रेकआधी मॅच संपवण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा होता. भारतीय संघ हॉटेलवरच जाऊन लंच करणार होती. पण टेम्बा बावुमाने टीम इंडियाला प्लॅन फेल केला.
साऊथ अफ्रिका कॅप्टन टेम्बाने टीम इंडियाला फक्त तीन विकेट घेण्यासाठी तब्बल 90 मिनिटं झुंजवलं. टेम्बाने फिफ्टी मारली अन् साऊथ अफ्रिकेला लढण्यासाठी समाधानकारक स्कोर उभा करून दिला. साऊथ अफ्रिकेने बॉलिंगमध्ये चांगली सुरूवात केली असून दोन्ही सलामीवीर तंबूत परतलेले आहेत.
आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात १५३ धावांवर गारद झाला आणि त्यांच्याकडे १२३ धावांची आघाडी होती . याचा अर्थ कोलकाता कसोटी जिंकण्यासाठी भारताला चौथ्या डावात १२४ धावा कराव्या लागतील . टीम इंडियाने पुन्हा एकदा गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात जसप्रीत बुमराह हिरो होता, तर दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने त्याच्या फिरकीचा वापर करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना एकामागून एक बाद केले . पाहुण्या संघाकडून कर्णधार टेम्बा बावुमाने सर्वाधिक ५५ धावा केल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 11:15 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : टेम्बा बावुमाने फेल केला हॉटेलवरच्या लंचचा प्लॅन, कोलकाता टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडिया इतक्या धावांची गरज!


