advertisement

छ. संभाजीनगर ते परभणी सुस्साट! रेल्वेचा 2179 कोटींचा गेमचेंजर प्लॅन, मराठवाड्यात काय होणार?

Last Updated:

Railway Update: मराठवाड्याच्या विकासाला चालना देणाऱ्या गेमचेंजर प्लॅनला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. 2179 कोटींच्या खर्चातून छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेचं दुहेरीकरण होणार आहे.

रेल्वे
रेल्वे
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांच्या विकासाला मदत होणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या या 177.79 किमी लांबीच्या मार्गासाठी केंद्राने 1 ऑगस्ट 2025 रोजी तब्बल 2 हजार 179 कोटी रुपये मंजूर केले. पुढच्या टप्प्यात या मार्गात संपादित होणाऱ्या जमिनीसाठी 21 ऑक्टोबर रोजी अधिसूचना निघाली आहे. जालना उपविभागातील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांकडून 21 नोव्हेंबरपर्यंत हरकती, सूचना व आक्षेप मागवण्यात आले आहेत. यानंतर सुनावणी, जमीन मोजणी, संपादन, मावेजा अदा केला जाईल. दुसरीकडे कामाच्या निविदा होऊन कार्यारंभ आदेश दिले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
advertisement
मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतीक्षित मनमाड-नांदेड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळेल. यादृष्टीने लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाकडून वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे हा विषय प्राधान्यक्रमावर आला. यानुसार केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही कामे हाती घेण्यात आली आहेत. यात छत्रपती संभाजीनगर ते परभणीपर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरणासाठी तीन महिन्यांपूर्वी निधीची तरतूद झाल्यावर जमीन संपादन व तत्सम बाबींना वेग आला आहे.
advertisement
या गावांतील जमीन संपादित होणार
जालना शहर व तालुक्यातील दरेगाव, हिस्वन बु., कारला, लोंढ्याची वाडी, माळीपिंपळगाव, ममदाबाद, पाचनवडगाव, रोहनवाडी, बदनापूर व तालुक्यातील दावलवाडी, मात्रेवाडी, रामखेडा, शेलगाव, वरुडी, गोकुळवाडी या 16 गावांमधील अंदाजे 20 हेक्टर 26 आर क्षेत्र दुहेरीकरणासाठी संपादित केले जाणार आहे. परतूर उपविभागातील आनंदवाडी, परतूर, खांडवी, उस्मानपूर, रायपूर, सातोना खु., सिरसगाव, मसला गावातील अंदाजे 7 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.
advertisement
दुहेरीकरण झाल्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांनाही फायदा होणार आहे. मालगाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक असल्याने शेतमाल आणि औद्योगिक माल वाहतुकीत मोठी क्रांती घडेल.
संयुक्त मोजणी अहवाल मागवला
प्राथमिक अधिसूचनेनुसार रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणासाठी जालना उपविभागातील ज्या गावातील जमीन संपादित होणार आहे, त्याचा संयुक्त मोजणी अहवाल त्या-त्या यंत्रणांकडून मागवण्यात आला आहे. हा अहवाल रेल्वे प्रशासनाला पाठवल्यावर अंतिम अधिसूचना निघून संपादित क्षेत्र व दर निश्चित होतील. त्यानंतर निवाडे होऊन बाधितांना मोबदला अदा केला जाईल. रेल्वे रुळालगतची मोजणी असल्यामुळे हे काम लवकर होईल, असे उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, नागपूर-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसारख्या मोठ्या औद्योगिक संकल्पनांना या मार्गाचा मोठा फायदा होईल. शिवाय, लॉजिस्टिक्स पार्क, कोल्ड स्टोअरेज, गोदामे आणि नवीन उद्योगांना चालना मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगर ते परभणी सुस्साट! रेल्वेचा 2179 कोटींचा गेमचेंजर प्लॅन, मराठवाड्यात काय होणार?
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement