IND vs AUS 5th T20 : बर्थडे बॉय तिलक वर्माला सूर्याने दिला 'जोर का झटका', रिंकु सिंगची एन्ट्री! पाहा प्लेइंग इलेव्हन
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Australia 5th T20 : ऑस्ट्रेलिया टीम हा सामना जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्यासाठी पूर्ण जोर लावेल. अशातच आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत.
India vs Australia 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 टी20 सामन्यांची मालिका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. आज ब्रिस्बेनच्या द गाबाच्या मैदानावर मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना खेळला जाणार आहे. सध्याच्या मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी अजेय बढत घेतली आहे आणि आजचा सामना जिंकून मालिका 3-1 ने जिंकण्याचा संघाचा प्रयत्न असेल. अशातच आता ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मागील सामन्यात 48 रन्सने दणदणीत विजय मिळवून मालिकेत 2-1 अशी महत्त्वाची बढत घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत एकाकी आघाडी घेण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया टीम हा सामना जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्यासाठी पूर्ण जोर लावेल. अशातच आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत.
advertisement
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून तिलक वर्माला आराम देण्यात आला आहे. तर रिंकु सिंगला संघात सामील करण्यात आलं आहे. दरम्यान, पीचच्या मध्यभागी काही भेगा आहेत, नवीन चेंडू गोलंदाजांना मदत करेल. खेळपट्टी कठीण आहे आणि तिथं गवतही आहे.
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, जितेश शर्मा (WK), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
view commentsऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श (C), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (WK), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 1:29 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS 5th T20 : बर्थडे बॉय तिलक वर्माला सूर्याने दिला 'जोर का झटका', रिंकु सिंगची एन्ट्री! पाहा प्लेइंग इलेव्हन


