IND vs NZ 3rd ODI : टॉस जिंकून शुभमन गिलने शोधला डॅरिल मिशेलचा पर्याय, इंदौर ODI मध्ये स्टार बॉलरची एन्ट्री, पाहा प्लेइंग इलेव्हन
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs New Zealand 3rd ODI : इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या मॅचमध्ये भारतीय संघासमोर गेल्या 37 वर्षांचा आपला दबदबा कायम राखण्याचे मोठे आव्हान असेल.
India vs New Zealand 3rd ODI, Indore : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 मॅचेसच्या वनडे सीरिजमधील शेवटचा आणि निर्णायक सामना आज रंगणार आहे. इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या मॅचमध्ये भारतीय संघासमोर गेल्या 37 वर्षांचा आपला दबदबा कायम राखण्याचे मोठे आव्हान असेल. सध्या भारतीय संघ फॉर्मात असून घरच्या मैदानावर किवी संघाला पुन्हा एकदा धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॅरिल मिशेलविरुद्ध पर्याय शोधला
टीम इंडियामध्ये एक मोठा बदल झाला असून शुभमन गिलने मोठा डाव खेळला आहे. पहिल्या दोन्ही वनडेमध्ये भारी पडलेल्या डॅरिल मिशेलविरुद्ध पर्याय शोधला आहे. टीम इंडियामध्ये अर्शदीप सिंगची एन्ट्री झाली आहे.
एकही वनडे मॅच गमावलेली नाही
गेल्या जवळपास 4 दशकांपासून भारतीय संघाने आपल्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध एकही वनडे सीरिज गमावलेली नाही, हा एक ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. विशेष म्हणजे इंदूरचे होळकर स्टेडियम भारतासाठी आतापर्यंत अत्यंत लकी ठरलं आहे. या मैदानावर भारतीय संघाने आजवर एकही वनडे मॅच गमावलेली नाही. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा ब्रिगेड हा विजयाचा वारसा पुढे नेण्यासाठी मैदानात उतरेल.
advertisement
37 वर्षांचा अभेद्य रेकॉर्ड
दरम्यान, होळकर स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जात असल्याने आज पुन्हा एकदा रन्सचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय फॅन्सना आपल्या लाडक्या खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असून, 37 वर्षांचा हा अभेद्य रेकॉर्ड कायम राहतो की न्यूझीलंड काही उलटफेर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन - डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क, जेडन लेनोक्स.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
Jan 18, 2026 1:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ 3rd ODI : टॉस जिंकून शुभमन गिलने शोधला डॅरिल मिशेलचा पर्याय, इंदौर ODI मध्ये स्टार बॉलरची एन्ट्री, पाहा प्लेइंग इलेव्हन








