ASIA CUP : पुन्हा पाकड्यांना लोळवण्याची संधी! 'इंडिया vs पाकिस्तान'मध्ये महामुकाबला, 'या' तारखेला दुबईतच भिडणार

Last Updated:

Asia Cup 2025 : पाकिस्तानने यूएईविरुद्ध विजय मिळवला तर ते सुपर फोरमध्ये स्थान निश्चित करतील. भारताने आधीच या ग्रुपमधून पुढील फेरीसाठी पात्रता मिळवली आहे

India vs Pakistan match will againt on 21st September
India vs Pakistan match will againt on 21st September
India Vs Pakistan : आशिया कपच्या (Asia Cup 2025) ग्रुप स्टेजच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला होता. अशातच अशिया कपच्या ग्रुप स्टेजमधील शेवटच्या मॅचमध्ये पाकिस्तानला (Pakistan) सुपर फोरमध्ये (Super Four) जाण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आजचा सामना जिंकावा लागेल. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता पाकिस्तानचा सामना यूएई (UAE) सोबत होणार आहे. अशातच आजचा सामना पाकिस्तानने जिंकला तर चार दिवसानंतर पुन्हा इंडिया आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत.

यूएईविरुद्ध विजय मिळवला तर...

पाकिस्तानने दोन मॅचमध्ये एक विजय आणि एक पराभव पत्करला आहे. दोन पॉईंट्ससह ते सध्या 'ग्रुप ए' मध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. नेट रन रेटच्या आधारावर ते यूएईच्या (दोन पॉईंट्स) पुढे आहेत, पण या मॅचमध्ये एकही चूक त्यांना स्पर्धेतून बाहेर करू शकते. पाकिस्तानने यूएईविरुद्ध विजय मिळवला तर ते सुपर फोरमध्ये स्थान निश्चित करतील. भारताने आधीच या ग्रुपमधून पुढील फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. जर पाकिस्तान पात्र ठरला, तर या दोन्ही संघांची टक्कर पुन्हा एकदा 21 सप्टेंबर म्हणजेच रविवारी दुबईमध्ये होईल.
advertisement

भारतासोबत खेळायचं असेल तर...

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मागील मॅचमध्ये, पाकिस्तानी फलंदाजांना स्पिनर्सविरुद्ध संघर्ष करावा लागला होता, तर भारतीय बॅटर्सनी पाकिस्तानी बॉलर्सची जोरदार धुलाई केली होती. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा भारतासोबत खेळायचं असेल तर पुन्हा तयारी करावी लागणार आहे, नाहीतर टीम इंडिया पुन्हा सहजरित्या पाकिस्तानला खेळ खल्लास करेल, यात कोणतीही शंका नाही.
advertisement
पाकिस्तानचा स्कॉड : सलमान अली आगा (Captain), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान मिर्जा, शाहीन अफरीदी, सुफयान मोकिम.
टीम इंडियाचा स्कॉड : सूर्यकुमार यादव (Captain), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ASIA CUP : पुन्हा पाकड्यांना लोळवण्याची संधी! 'इंडिया vs पाकिस्तान'मध्ये महामुकाबला, 'या' तारखेला दुबईतच भिडणार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement