India vs Pakistan : मोदींच्या ट्विटनंतर 12 तासांनी पाकिस्तानला जाग! ट्रॉफी घेऊन पळालेले Mohsin Naqvi यांनी पुन्हा काढली खोड
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mohsin Naqvi reply on Narendra Modi Tweet : एशियन क्रिकेट काउंसिल (ACC) चे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्वीटला उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
India vs Pakistan, Mohsin Naqvi Post : आशिया कप 2025 च्या अंतिम मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर, मॅचवर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयानंतर टीम इंडियासाठी शुभेच्छा दिल्या आणि पाकिस्तानला टोले लगावले. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष आणि एशियन क्रिकेट काउंसिल (ACC) चे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्वीटला उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले Mohsin Naqvi?
जर युद्ध तुमच्या अभिमानाचे माप असेल, तर इतिहासात पाकिस्तानकडून झालेल्या अपमानास्पद पराभवांची नोंद आहे. कोणताही क्रिकेट सामना हे सत्य पुन्हा लिहू शकत नाही. खेळात युद्ध ओढल्याने केवळ निराशाच उघड होतं आणि खेळाच्या आत्म्याला कलंकित करतं, असं म्हणत मोहसिन नक्वी यांनी नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर देण्याती हिंमत केली आहे.
advertisement
नरेंद्र मोदींनी ट्विट करत काय म्हटलं होतं?
रोमहर्षक सामन्यात भारताने 5 गडी राखून विजय मिळवला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या विजयावर खास ट्वीट केलं. हॅशटॅक ऑपरेशन सिंदूर हे मैदानात सुद्धा सुरूच आहे. मैदानात सुद्धा तेच उत्तर मिळालं, भारताचा विजय झाला, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी भारतीय टीमचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हटके शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर एकच धुरळा उडाला. पाकिस्तानच्या टीमला आता ट्रोल केलं जात आहे.
advertisement
#OperationSindoor on the games field.
Outcome is the same - India wins!
Congrats to our cricketers.
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2025
दरम्यान, दोन्ही देशातील राजकीय संबंध ताणले असताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी युएनमध्ये भारतावर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्याला भारताने देखील चांगलंच प्रत्युत्तर दिलं. अशातच मोदींनी सॉफ्ट पावरचा वापर करत पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवला. टीम इंडिया जिंकल्यानंतर मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला अन् पाकिस्तानला पुन्हा जागा दाखवून दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 1:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
India vs Pakistan : मोदींच्या ट्विटनंतर 12 तासांनी पाकिस्तानला जाग! ट्रॉफी घेऊन पळालेले Mohsin Naqvi यांनी पुन्हा काढली खोड