PAK vs NZ : कोट्यवधी भारतीयांचं स्वप्नभंग! पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर

Last Updated:

New Zealand W vs Pakistan W : न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव करत सेमीफायनलचं तिकीट मिळवलं, तसेच टीम इंडियाचा टी-ट्वेटी वर्ल्ड कपमधील प्रवास इथेच संपलाय. इंडिया वुमेन्स टीम टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे.

New Zealand W vs Pakistan W
New Zealand W vs Pakistan W
Women's T20 World Cup : वुमन्स टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील पाकिस्तान वुमेन्स आणि न्यूझीलंड वुमेन्स यांच्यात अखेरचा अ गटातील साखळी फेरीत सामना खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव करत सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. न्यूझीलंडच्या विजयामुळे आता टीम इंडियाचं स्वप्नभंग झालं. टीम इंडिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर गेली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला 111 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानचा संघ फक्त 56 धावांवर गुंडाळलं आणि 54 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ अ गटातून सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत.
पाकिस्तानसाठी 111 धावांचं आव्हान खूप सोपं होतं. मात्र, सेमीफायनल गाठण्यासाठी पाकिस्तानला 10.4 ओव्हरमध्ये आव्हान पूर्ण करायचं होतं. त्यासाठी पाकिस्तानने आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा पण न्यूझीलंडने बॅटर्सला मैदानात पाय ठेऊ दिला नाही. फक्त 28 धावांवर पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र, कॅप्टन फातिमा सना एकटी मैदानात उभा राहिली. मात्र, पाकिस्तानला केवळ 56 धावाच करता आल्या. न्यूझीलंडने 54 धावांनी विजय मिळवला.
advertisement
न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळून देखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी पावरप्लेमध्ये चोप दिला पण पाकिस्तानने मजबूत कमबॅक केलं. नशरा संधूने दोन्ही ओपनर्सला माघारी पाठवल्यानंतर न्यूझीलंडची टीम पत्त्यासारखी ठेपाळली. त्यानंतर ब्रुक हालिडे वगळता कोणतीही बॅटर मैदानात टिकली नाही. ब्रुक हालिडेने 22 धावांचं योगदान दिलं, त्यामुळे न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 110 धावा करता आल्या.
advertisement
टीम इंडियासाठी होती संधी
जर पाकिस्तानने हा सामना जिंकला असता तर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गेली असती. पाकिस्तानसाठी विजय सोपा होता, त्यांना विजयासाठी केवळ 111 धावांची गरज होती. पाकिस्तानने हे आव्हान जर 10.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं असतं तर पाकिस्तानला देखील सेमीफायनल गाठण्याची संधी होती. मात्र, जर पाकिस्तानने सामना 10.4 ओव्हरनंतर जिंकला असता तर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गेली असती. मात्र, न्यूझीलंडने सहज विजय मिळवून सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे.
advertisement
पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, सदफ शमास, निदा दार, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल.
न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हालिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs NZ : कोट्यवधी भारतीयांचं स्वप्नभंग! पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement