IPL 2025 : गुजरातच्या धक्क्यानंतर मुंबईला 24 तासात गुड न्यूज, प्ले-ऑफच्या मार्गातला एक काटा दूर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सला अखेर विजय मिळवण्यात यश आलं आहे. यंदाच्या मोसमातला सीएसकेचा हा फक्त तिसराच विजय आहे.
कोलकाता : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सला अखेर विजय मिळवण्यात यश आलं आहे. यंदाच्या मोसमातला सीएसकेचा हा फक्त तिसराच विजय आहे. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा 2 विकेटने विजय झाला आहे. केकेआरने दिलेले 180 रनचं आव्हान सीएसकेने 19.4 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून पार केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 60 रनवरच 5 विकेट गमावल्या होत्या, पण डेवाल्ड ब्रेविस आणि शिवम दुबे यांनी कोलकात्याच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.
डेवाल्ड ब्रेविसने 25 बॉलमध्ये 52 रनची आक्रमक खेळी केली. याशिवाय शिवम दुबेने 45 रन केले. चेन्नईला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 8 रनची गरज होती तेव्हा एमएस धोनीने आंद्रे रसेलच्या पहिल्याच बॉलला सिक्स मारून चेन्नईला विजयाच्या दिशेने नेलं.
केकेआरला धक्का, मुंबईला दिलासा
चेन्नईविरुद्धच्या या पराभवाचा धक्का केकेआरला बसला असला तरी मुंबई इंडियन्सना मात्र दिलासा मिळाला आहे. केकेआरचं प्ले-ऑफला पोहोचणं आता जवळपास अशक्य झालं आहे, तर मुंबईसाठी मात्र प्ले-ऑफच्या रेसमधून आणखी एक टीम कमी झाल्याचा दिलासा मिळाला आहे. केकेआरने या मोसमात 12 पैकी 5 मॅच जिंकल्या असून त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे त्यांच्या खात्यात 11 पॉईंट्स आहेत.
advertisement
केकेआरने उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला तरी त्यांचे जास्तीत जास्त 15 पॉईंट्स होतात. सध्या गुजरात, आरसीबी 16-16 पॉईंट्ससह पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर तर 15 पॉईंट्ससह पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आणि 14 पॉईंट्ससह मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीचेही 11 सामन्यांमध्ये 13 पॉईंट्स आहेत.
सध्याच्या पॉईंट्स टेबलनुसार केकेआरने उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तरीही ते गुजरात, आरसीबी आणि पंजाबच्या पुढे जाऊ शकत नाहीत. तर दुसरीकडे मुंबईने एक सामना जिंकला तर किंवा दिल्लीने 3 पैकी 2 सामने जिंकले तरी केकेआरचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगणार आहे.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
May 07, 2025 11:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : गुजरातच्या धक्क्यानंतर मुंबईला 24 तासात गुड न्यूज, प्ले-ऑफच्या मार्गातला एक काटा दूर!


